विशेष प्रतिनिधी
लातूर : देशात रस्त्यांचे जाळे उभारून आणि दररोज पस्तीस किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या महामार्गाचे काम करून रस्ते वाहतूक मंत्रालयाने विक्रम केला आहे. आणखी एक विक्रम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या खात्यावर जमा झाला असून कमी खर्चाचा आणि कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूर येथे उभारण्यात आला आहे.Another record of the Union Ministry of Road Transport, the country’s first low-cost, low-weight bridge in Latur
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खचार्चा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. त्याची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
मलेशियन ड्युरा उच्च तंत्रज्ञानाने बनविलेल्या पुलाची लांबी १११ मीटर व रुंदी १६ मीटर आहे. वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ५५.५० मीटर लांबीच्या दोन स्पॅनच्या बांधणीतून तयार करण्यात आला आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण पुलामध्ये लोखंडी सळयांऐवजी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्स्ड तंत्रज्ञान वापरले आहे.
ज्यामध्ये स्टील फायबर असलेले गर्डर वापरले जाते. हे गर्डर वजनाने हलके असल्याने पुलाचे वजन कमी होते. हाताळणी आणि कामही जलदगतीने होते. नव्या तंत्रज्ञानाचा हा पूल गंजरोधक, कार्बन व पाणी प्रतिरोधक असल्याने जास्त टिकाऊ आहे. पुलाच्या पायाच्या प्रकारानुसार बांधकाम खर्चातही सुमारे २५ टक्क्यांपर्यंत कपात होते.
Another record of the Union Ministry of Road Transport, the country’s first low-cost, low-weight bridge in Latur