• Download App
    नीरज चोप्राचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले: पालकांनी पहिल्यांदा केला हवाई दौराAnother dream of Neeraj Chopra came true: first air tour to parents

    नीरज चोप्राचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले: पालकांनी पहिल्यांदा केला हवाई दौरा

    भालाफेकमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने शनिवारी ट्विट करून आनंद व्यक्त केला. नीरजने चार्टर्ड फ्लाइटमध्ये त्याच्या पालकांसोबत एक फोटो शेअर केला.Another dream of Neeraj Chopra came true: first air tour to parents


    विशेष प्रतिनिधी

     नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय खेळाडू नीरज चोप्राचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.भालाफेकमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने शनिवारी ट्विट करून आनंद व्यक्त केला. नीरजने चार्टर्ड फ्लाइटमध्ये त्याच्या पालकांसोबत एक फोटो शेअर केला.

    त्याने हे चित्र शेअर केले आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले,’आज आयुष्याचे एक स्वप्न पूर्ण झाले जेव्हा मला माझे पालक पहिल्यांदा फ्लाइटवर बसलेले दिसले.  प्रत्येकाच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन. ‘



    टोकियोहून परत आल्यानंतर नीरजची व्यस्तता वाढली आहे.तो वेगवेगळ्या ठिकाणी सतत सन्मान कार्यक्रमाला हजर असतात.या सगळ्यामुळे तो आपल्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाही.

    मात्र, गेल्या महिन्यात त्याने सांगितले होते की, 2021 मध्ये होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये तो कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सहभागी होणार नाही.  पण 2022 मध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेईल.

    Another dream of Neeraj Chopra came true: first air tour to parents

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले