• Download App
    PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, म्हैसूरमध्ये रोड शोत महिलेने फुलांसह फेकला मोबाईलAnother big mistake in PM Modi's security, woman threw mobile phone with flowers in roadshow in Mysore

    PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, म्हैसूरमध्ये रोड शोत महिलेने फुलांसह फेकला मोबाईल

    प्रतिनिधी

    म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पुन्हा एकदा PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. येथे पंतप्रधानांचा रोड शो सुरू असताना एका महिलेने आपला मोबाईल त्यांच्या वाहनाकडे फेकला. पोलिसांनी संबंधित महिलेला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. Another big mistake in PM Modi’s security, woman threw mobile phone with flowers in roadshow in Mysore

    चौकशीत महिलेने सांगितले की, ती भाजपची कार्यकर्ता आहे आणि हे चुकून घडले. महिलेने सांगितले की, ती पंतप्रधानांच्या दिशेने फुले फेकत होती, पण तिच्या नकळत मोबाईलही फुलासोबत गेला.

    महिलेचा हेतू वाईट नव्हता – पोलीस

    अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), कायदा आणि सुव्यवस्था, आलोक कुमार यांनी सांगितले की हा फोन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्याचा होता आणि पंतप्रधान मोदी विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षणाखाली होते.

    ते म्हणाले, “ज्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या वाहनावर फोन फेकला त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. त्यांनी उत्साहाच्या भरात असे केले. पंतप्रधान एसपीजीच्या संरक्षणात होते. फोन भाजपच्या एका कार्यकर्त्याचा आहे. आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला आहे.” आणि फोन एसपीजीकडून त्या व्यक्तीकडे सोपवण्यात आला आहे.

    Another big mistake in PM Modi’s security, woman threw mobile phone with flowers in roadshow in Mysore

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..