• Download App
    देवदूत सोनू सूद : भज्जी भाईचे ट्विट सोनूची तत्परता ; ५ तासात पोहचवले रेमेडेसिव्हर Angel Sonu sood helped bhaji bhai 

    देवदूत सोनू सूद : भज्जी भाईंचे ट्विट सोनूची तत्परता ; ५ तासात पोहचवले रेमेडेसिव्हर

    • सोनूने क्रिकेटर सुरेश रैनाला मदत केली होती. त्यानंतर आता माजी गोलंजाद हरभजन सिंग याच्या मदतीसाठीही सोनू धावून आलाय.

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई :  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत असताना पुन्हा एकदा बाॅलिवूड अभिनेता आणि मसिहा सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच तो दिग्गजांच्याही मदतीला धावून जात आहे. नुकतेच टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजनसिंगलाही सोनूने मदत केली.Angel Sonu sood helped bhaji bhai

    हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन, 1 रेमेडेसिव्हर इंजेक्शनची अर्जंट गरज असल्याचं म्हटलं होतं. भज्जीच्या या ट्विटला 10 ते 12 मिनिटांतच सोनूने रिप्लाय दिला. त्यामध्ये, भज्जी थोड्यात वेळात इंजेक्शन तिथे पोहोचलेलं असेल, असे ट्विट सोनू सूदने केल.

    कर्नाटकमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास या इंजेक्शनची गरज होती. त्याबाबतचे संपूर्ण तपशील भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये दिला होता. त्यानंतर, सोनू सूदने या ट्विटची दखल घेत, तात्काळ इंजेक्शन पुरविण्याची सोय केली आहे.

    त्यानंतर सोनूने तातडीने रेमडेसिविर औषध त्या गरजूपर्यंत पोहोचवलं. यानंतर हरभजन सिंगने सोनूने सूदचे आभार मानले. हरभजनने ट्विट करत धन्यवाद ब्रदर, असं म्हटलं.

    सोनू सूद लोकांना सतत मदत करतो आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लॉन्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लॉन्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणतो आहेत. त्यासोबतच तो अनेकांच्या अडचणींना दररोज तोंड देत आहे.

    सोनू सूदकडून पहिल्या ऑक्सिजन प्लॉन्टची ऑर्डर देण्यात आली आहे आणि ते 10-12 दिवसांत फ्रान्समधून भारतात येईल. सोनू सूद पुढे म्हणाला, ‘वेळ आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर येईल आणि आम्ही अधिक जीव गमावू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत’.

    सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती.

    Angel Sonu sood helped bhaji bhai

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!