देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीसह यादी आली आहे समोर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्लेषित केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे ५१० कोटींच्या एकूण संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. ADR अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ हे करोडपती आहेत, केवळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती १५ लाख रुपये आहे. Andhra Pradesh chief minister Jaganmohan Reddy is the wealthiest chief minister of the country
ADR ने सांगितले की, विश्लेषण केलेल्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ (९७ टक्के) कोट्यधीश आहेत आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी ३३.९६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ADR अहवालानुसार, ३० पैकी १३ (४३ टक्के) मुख्यमंत्र्यांवर खून, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी धमकी यांसंबंधी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मालमत्तेच्या बाबतीत अव्वल तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी (५१० कोटींहून अधिक), अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (१६३ कोटींहून अधिक) आणि ओडिशाचे नवीन पटनायक (६३ कोटींहून अधिक) या तिघांचा समावेश आहे.
याशिवाय ADR ने माहिती दिली की, कमी घोषित संपत्ती असलेल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (१५ लाखांपेक्षा जास्त), केरळचे पिनाराई विजयन (१ कोटींहून अधिक) आणि हरियाणाचे मनोहर लाल (१ कोटींहून अधिक) यांचा समावेश आहे.
Andhra Pradesh chief minister Jaganmohan Reddy is the wealthiest chief minister of the country
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!