Kapil Sibal : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी याप्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सलग अनेक ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, या घटनेमुळे मी दु:खी आहे. त्यांनी लिहिले की, कपिल सिब्बल यांच्या घरी झालेल्या हल्ल्याची आणि गुंडगिरीची बातमी ऐकून धक्का बसला आणि निराश झालो. अशा कृत्यामुळे पक्षाची बदनामी होते, याचा तीव्र निषेध केला पाहिजे. Anand Sharma Slams Hooliganism Outside Kapil Sibal House, Urges Sonia Gandhi To Take Action
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी याप्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सलग अनेक ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, या घटनेमुळे मी दु:खी आहे. त्यांनी लिहिले की, कपिल सिब्बल यांच्या घरी झालेल्या हल्ल्याची आणि गुंडगिरीची बातमी ऐकून धक्का बसला आणि निराश झालो. अशा कृत्यामुळे पक्षाची बदनामी होते, याचा तीव्र निषेध केला पाहिजे.
काँग्रेस नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने : आनंद शर्मा
काँग्रेस नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. मत आणि धारणा यातील फरक लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेत. परंतु असहिष्णुता आणि हिंसा काँग्रेसच्या मूल्यांपासून आणि संस्कृतीपासून पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांनी पुढे लिहिले की, जबाबदारांना ओळखून त्यांच्यावर कारवाई व्हावी. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी सिब्बल यांच्या घराबाहेर निदर्शने
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर बुधवारी अनेक कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. एवढेच नाही, तर आंदोलक कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घरावर टोमॅटो फेकले आणि त्यांच्या वाहनाचे नुकसान केले.
Anand Sharma Slams Hooliganism Outside Kapil Sibal House, Urges Sonia Gandhi To Take Action
महत्त्वाच्या बातम्या
- जानेवारीत सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार; महापालिकेचा दावा, आतापर्यंत १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस
- तालिबानचा भारताला संदेश , पत्र लिहून भारताला केली ‘ही’ मागणी
- बिल गेट्स यांनी ‘आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन’ची केली प्रशंसा , पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली
- दिल्ली : राजधानी दिल्लीत रामलीला स्टेजिंग आणि दुर्गा पूजेला मंजुरी , कोविड प्रोटोकॉल अनिवार्य
- स्टेट बँकेत ६०६ पदांची होणार भरती, अधिकारी म्हणून काम करण्याची संधी