earthquake in Ladakh : लडाखममध्ये शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. भूकंपाची माहिती देणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने म्हटले की, शनिवारी सकाळी 8.27 वाजता लडाखमध्ये हलक्या भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदवण्यात आली. An earthquake in Ladakh of magnitude 3 on the Richter scale at 8 am recorded today
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लडाखममध्ये शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. भूकंपाची माहिती देणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने म्हटले की, शनिवारी सकाळी 8.27 वाजता लडाखमध्ये हलक्या भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदवण्यात आली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार हा भूकंप कारगिलजवळ जाणवला असून त्याची खोली जमिनीच्या आत 40 किलोमीटर होती.
लडाखमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवारीसुद्धा सकाळी 11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 होती.
म्हणजेच शनिवारी जो भूकंप झाला तो शुक्रवारच्या भूकंपापेक्षा कमी तीव्रतेचा होता. हा भूकंप लेहमध्ये जाणवला आणि त्याची खोली 90 किलोमीटर होती. गेल्या 24 तासांत 6 वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
An earthquake in Ladakh of magnitude 3 on the Richter scale at 8 am recorded today
महत्त्वाच्या बातम्या
- Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद भंग केली, मध्यावधी निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर
- Corona Cases In India : २४ तासांत २.५७ लाख नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाने घटली
- Air India Data Leak : 45 लाख प्रवाशांच्या क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला, कंपनी म्हणते – पेमेंट डेटा सुरक्षित
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु
- शेतकरी संघटनांचे अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, आंदोलन मागे घ्यायचेय, चर्चेसाठी पंतप्रधानांना पत्रही पण…