प्रतिनिधी
मुंबई : बंगलोर मध्ये 26 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन विरोधकांची नवी INDIA आघाडी स्थापन केली. या आघाडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवालही सहभागी झाले. त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेला संबोधित देखील केले.An alliance is not made by just bringing together leaders!!; Kejriwal’s video goes viral after INDIA Aghadi formation
केजरीवाल यांच्या नव्या INDIA आघाडीत सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशातल्या फक्त नेत्यांना एकत्र करून कोणत्याही अलायन्स होणार नाही, तर 140 कोटी जनतेला एकत्र केल्यावर काही अलायन्स तयार होऊ शकेल. हे तोडामोडीचे राजकारण मला काही कळत नाही. किंवा आघाड्या मला करता येत नाहीत, असे केजरीवाल एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांचा तोच व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच व्हिडिओत ते बंगलोरमध्ये विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीला सामील होण्यासाठी जात असल्याचेही दिसत आहे.
मला तोडामोडीचे राजकारण, आघाड्या हे काही समजत नाही. तुम्हाला शाळा बनवायची असेल, हॉस्पिटल बनवायचे असेल, रस्ते बनवायचे असतील तर मला बोलवा, तुम्हाला वीज कनेक्शन ठीक करायचे असेल तर मला बोलवा कारण मी आयटी इंजिनियर आहे. राजकारणी नाही, असे केजरीवाल त्या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
पण केजरीवाल प्रत्यक्षात कालच्या बंगलोर मधल्या नव्या INDIA आघाडीत सामील होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उतरले आहेत. केजरीवालांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून विसंगत राजकीय भूमिका समोर आली आहे.
An alliance is not made by just bringing together leaders!!; Kejriwal’s video goes viral after INDIA Aghadi formation
महत्वाच्या बातम्या
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सुप्रिया सुळेंच्या गैरहजर; काँग्रेस नेते आणि पवारनिष्ठ माध्यमांनाच दाट संशय!!
- तारक मेहता का उल्टा या मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार ?
- नेहले पे देहला : INDIA 26 विरुद्ध NDA 38; INDIA चा नेता कोण??; पण NDA ला मोदींचा बुस्टर डोस!!