• Download App
    Amritsar Golden Temple youth death: सुवर्ण मंदिरात तरुणाकडून गुरु ग्रंथ साहिबची विटंबना ; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू| Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth Sahib by youth in Golden Temple; Young man killed in beating of devotees

    Amritsar Golden Temple youth death: सुवर्ण मंदिरात तरुणाकडून गुरु ग्रंथ साहिबची विटंबना ; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

    अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth Sahib by youth in Golden Temple; Young man killed in beating of devotees


    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर: पंजाबमधील अमृतसर सुवर्ण मंदिरात एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पवित्र गुरु ग्रंथ साहिबसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथित हत्या (लिंचिंग) करण्यात आली आहे. डीसीपी परमिंदर सिंग यांनी या व्यक्तीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण प्रचंड तापले आहे.



     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पठणादरम्यान (Rehraas Sahib Paath) एका अज्ञात व्यक्तीने सुवर्ण मंदिराच्या आत रेलिंगवरून उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिबसमोर ठेवलेली तलवार हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथे जमावाने चिडून तरुणाला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    एसजीपीसीचे कार्यकारिणी सदस्य भाई गुरप्रीत सिंग रंधावा यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ‘श्री अमृतसर साहिबमधील दुर्दैवी घटनेचा निषेध करतो, पंजाब सरकारने त्वरित याची चौकशी करावी.’

    या घटनेची पुष्टी करताना अमृतसरचे डीसीपी परमिंदर सिंह म्हणाले, ‘मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला आहे. जेव्हा घटना घडली त्यावेळी तो एकटाच होता असे दिसते. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.’

    असे सांगितले जात आहे की, तरुणाने अचानक ग्रीलवरून उडी मारली आणि साहिबजींपर्यंत पोहोचला. मुख्य इमारतीत फक्त ग्रंथींनाच बसण्याची परवानगी आहे. दरबार साहिबच्या या ठिकाणी, पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचा प्रकाश आहे. पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही हरिमंदिर साहिब गुरुद्वारामध्ये कथितपणे घुसलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली.

    भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी याप्रकरणी कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेबाबत आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रकरणी आपल्याला त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

    Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth Sahib by youth in Golden Temple; Young man killed in beating of devotees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य