• Download App
    अमरिंदर सिंग अप्रिय तर उध्दव ठाकरे, शिवराजसिंग चौहान लोकप्रिय मुख्यमंत्री Amrinder singh non popular CM, Uddhav Thacckeray and Shivraj singh Chauhan tops the list

    अमरिंदर सिंग अप्रिय तर उध्दव ठाकरे, शिवराजसिंग चौहान लोकप्रिय मुख्यमंत्री

    प्रतिनिधी

    मुंबई – महाविकास आघाडीमध्ये राजकीय धुसफूस असली, कोरोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. अमरिंदर सिंग हे सर्वात अप्रिय मुख्यमंत्री आहेत. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील निम्म्या मतदारांनी (४९ टक्के) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला आहे. Amrinder singh non popular CM, Uddhav Thacckeray and Shivraj singh Chauhan tops the list

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ते त्यांना पुन्हा निवडून येतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ४४ टक्के मते मिळवून दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. ४० टक्के मतदारांनी त्यांची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले आहे.



    उद्धव ठाकरे आणि शिवराज चौहान हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, तर उत्तराखंडचे तीन मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंह हे लोकप्रिय नाहीत. यामध्ये गुजरातमध्ये विजय रूपाणी दहाव्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचवे सर्वात स्थानावर आहेत. पुढच्या वर्षी उत्तराखंड, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत.

    देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत. प्रश्नमने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे. पहिल्या फेरीत १३ ज्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत.

    Amrinder singh non popular CM, Uddhav Thacckeray and Shivraj singh Chauhan tops the list

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये