• Download App
    मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार Amit Shah's ambition to win 45 Lok Sabha seats from Maharashtra from Nanded

    मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार

    प्रतिनिधी

    नांदेड : केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षांमध्ये विकसित भारताचा पाया रचला. या पुढे आपल्याला विकासाची आणखी मोठी गारुड भरारी घ्यायची आहे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमधून महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा हुंकार भरला. Amit Shah’s ambition to win 45 Lok Sabha seats from Maharashtra from Nanded

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. अमित शाह यांच्या  भाषणाआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षात किती चांगली कामे झाली याचे वर्णन केले. त्यानंतर अमित शाह यांनी भाषण केले.

    अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

    अमित शाह म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेच्या 45 जागा जिंकण्यासाठी निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांचे काम आजही सुरू आहे, अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

    अमित शाह म्हणाले :

    मराठवाड्याचा प्रांत एकेकाळी हैदराबादचा भाग होता. पण नांदेड आणि मराठवाड्याला देशाला स्वातंत्र्य मिळालेला नव्हता. इथल्या जनतेला अमानुष राजवटीचा सामना करावा लागला. 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळाले होते.

    भाजपचे सरकार आणि मोदींच्या नेतृत्वातील सरकारने आज 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी नांदेड आणि महाराष्ट्राच्या जनतेचा धन्यवाद द्यायला आलो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने खुल्या मनाने भाजपला मतदान केले होते. मोदी सरकारचे 9 वर्ष हे भारत गौरव, विकासाचे ठरले आहेत. हे वर्ष गरीब कल्याणाचे वर्ष ठरले आहेत. 10 वर्षाच्या काँग्रेस सरकारनंतर मोदी सरकारने सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडविले. विकसित भारताचा पाया रचला.

    सोनिया-मनमोहन सरकारमध्ये शरद पवार होते. ते सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होते. त्यांनी 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. पण गेल्या 9 वर्षात आमचे विरोधात ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकले नाहीत.

    आधी देशात बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी मनमोहन सिंह यांच्या मुखातून काहीच बोल निघायचे नाही. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला घरात घुसून मारले.

    नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात गरीब कल्याणाची कामे झाली.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही जनतेने 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला कौल दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या घरी आम्ही चर्चेसाठी गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, याची कबुली दिली होती. पण नंतर त्यांची बुद्धी फिरली आणि ते मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.

    Amit Shah’s ambition to win 45 Lok Sabha seats from Maharashtra from Nanded

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य