- राज्यसभा – विधान परिषद निवडणुकीचा विलक्षण योगायोग!!
नाशिक : मध्यंतरी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असताना महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या थोडेसे दुर्लक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात “लक्ष” घालायला सुरुवात केली आहे. amit shah visit maharashtra after modi
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धोबीपछाड दिल्यानंतर चारच दिवसांनी आज 14 जून 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूच्या शिळा मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी मुंबईत राजभवनातील जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा गॅलरीचे उद्घाटन केले, तसेच मुंबई समाचारच्या द्विशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या तीनही कार्यक्रमांची महाराष्ट्रात दिवसभर चर्चा राहिली.
पंतप्रधान मोदींचा 14 जूनचा महाराष्ट्र आणि मुंबई दौरा संपल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 21 जून 2022 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठाला भेट देऊन विविध प्रकल्पांची उद्घाटने करणार आहेत. केंद्रीय तपास संस्थांनी अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष ठिकाणांची पाहणी केली आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमापाठोपाठ अमित शहा यांचा महाराष्ट्रात कार्यक्रम होणे याला निश्चित राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम राज्यसभा निवडणूक पार पडल्या नंतर झाला आहे. त्या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणून शिवसेना आणि महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह देहू आणि मुंबईतल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. 20 जून रोजी विधानपरिषद निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत देखील भाजपचा महाविकास आघाडीशी जोरदार सामना होणे अपेक्षित आहे. मात्र ही निवडणूक झाल्यानंतर दुसर्याच दिवशी अमित शहा यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार आहेत. याला देखील राजकीय दृष्ट्या फार महत्त्व आहे.
पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यानंतर अजित पवारांना भाषण करू दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने वाद घातला आहे. परंतु, त्याच वेळी पंतप्रधान मोदी हे आपल्या हेलिकॉप्टरमधून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन मुंबईला पोहोचले होते. आता अमित शहा 21 जून रोजी महाराष्ट्रात येऊन नेमक्या कोणत्या राजकीय खेळी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
amit shah visit maharashtra after modi
महत्वाच्या बातम्या