• Download App
    पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात आजपासून अमित शहांचा झंजावाती दौरा । Amit Shah starts vist in varanasi

    पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात आजपासून अमित शहांचा झंजावाती दौरा

    वृत्तसंस्था

    लखनौ : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा शुक्रवारी वाराणसीचा दौऱ्यावर दाखल होतील. हा दौरा दोन दिवसांचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. Amit Shah starts vist in varanasi

    विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील. सोशल मीडिया शाखेचे स्वयंसेवक आणि आणि बूथ अध्यक्ष यांच्या स्वतंत्र बैठका ते घेतील.



    राज्याच्या पूर्व विभागातील विभागातील लोकप्रतिनिधींच्या कामगिरीविषयी ते माहिती घेतील. ४०३ पैकी ६१ आमदार या विभागातून निवडून येतात. २०१७ मध्ये भाजपने येथे ३४ जागा जिंकत राज्यात बाजी मारली होती.

    शनिवारी अमित शहा आझमगढमध्ये जाहीर सभा घेतील. तेथील विद्यापीठाचा कोनशिला समारंभ त्यांच्याहस्ते होईल. आझमगढची जनता १९७० च्या दशकापासून विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी करीत होती.

    Amit Shah starts vist in varanasi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार