विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जे भाषण केले, त्याने आत्तापर्यंतची संसदीय भाषणांची सर्व रेकॉर्ड मोडली. amit shah speech all record break
- अमित शाह यांचे संसदेतील हे ऐतिहासिक भाषण ठरले. त्यांनी लोकसभेतील आजच्या भाषणातून सर्व विक्रम मोडीत काढले.
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतील हे सर्वांत मोठे संसदीय भाषण ठरले. अमित शाह यांनी 133 मिनिटांचे म्हणजे 2 तास 13 मिनिटांचे उत्तराचे भाषण केले.
- अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण वगळता, संसदेत मंत्री किंवा नेत्याचे हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे भाषण ठरले.
- अमित शहांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा विक्रम मोडला. त्यांनी शास्त्रीजींपेक्षा 1 मिनिट जास्त वेळ घेतला.
- 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावर 2 तास 12 मिनिटांचे भाषण केले होते.
- तिसरे सर्वात मोठे भाषण 2003 मध्ये सुषमा स्वराज यांचे होते. सुषमा स्वराज यांनी पूर्ण 105 मिनिटे म्हणजे 1 तास 45 मिनिटे भाषण केले होते.
- चौथ्या क्रमांकावरील अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ९० मिनिटांचे म्हणजेच १ तास ३० मिनिटांचे होते. 1996 मध्ये त्यांनी संसदेत आपल्या 13 दिवसांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडताना हे भाषण केले होते.
- अविश्वास ठरावावर उत्तर देण्याबाबत केंद्रातील भाजप आघाडी सरकार किती गंभीर आहे, हेच अमित शाह यांच्या भाषणातून दिसून आले.
amit shah speech all record break
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??