विशेष प्रतिनिधी
अयोध्या : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यानिमित्त आज अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. तेथे त्यांनी सुरुवातीला हनुमान गढी येथे जाऊन श्री हनुमंतांचे दर्शन घेतले. त्यानंतर रामजन्मभूमी स्थली जाऊन राम लल्लांचे दर्शन घेतले आहे. Amit Shah in Ayodhya; Shriram went to his birth place and bowed at the feet of Ramlal !!
या संदर्भातले ट्विट अमित शहा यांनी स्वतःच्या ट्विटर हँडल वर केले आहे. असंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम जन्मभूमी मंदिरात जाऊन राम लल्लांचे दर्शन घेऊन मी अभिभूत झालो आहे. कोट्यावधी हिंदूंनी अविरत संघर्ष केल्यानंतर राम जन्मभूमी मंदिराची उभारणी आता होत आहे. श्रीराम लल्ला हे त्यांच्या उचितच स्थानी विराजमान आहेत हे पाहून हृदय आनंदाने भरून आले आहे, असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमित शहा सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक ठिकाणी मेळाव्यांना आणि जाहीर सभांना संबोधित केले आहे. आज ते अयोध्येत आले आहेत आणि त्यांनी हनुमान गढी येथे श्री हनुमंताचे आणि राम जन्मभूमी स्थळी जाऊन श्रीराम लल्लांचे दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांनी राम मंदिर बांधकाम स्थळी जाऊन पाहणी केली तेथे अमित शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Amit Shah in Ayodhya ; Shriram went to his birth place and bowed at the feet of Ramlal !!
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुंबईत संध्याकाळी ५ नंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यास बंदी ; १५ जानेवारीपर्यंत आदेश लागू
- IT Raid : १२ देशांत अत्तराचा व्यवसाय, १२वीपर्यंत शिक्षण, जाणून घ्या सपा आमदार पुष्पराज जैन यांच्याबद्दल, ज्यांच्यावर सुरू आहेत प्राप्तिकराचे छापे
- जालन्यात उडाली खळबळ ! आईची चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या
- कपड्यांची महागाई तूर्त टळली; जीएसटी वाढवण्याचा निर्णय फेब्रुवारी 2022 बैठकीपर्यंत लांबणीवर