विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रात नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला त्यावरून बाकीच्या पक्षांनी फारशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत.Amit shah become co opration minister, NCP leader jayant patil targets him over banks autonomy
पण त्यांचे सहकारमंत्री होणे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीला टोचले. महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या बाबतीत जयंत पाटलांनी आपले नेते शरद पवार यांचीच री ओढली आहे. शरद पवारांनी साखर उद्योग, बांधकाम व्यावसायिक, सहकारी बँका याच विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहिली आहेत. हेच विषय जयंत पाटलांनी प्रतिक्रियेत आणले आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचे नाव फार चर्चेत आले होते. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे, अशी टिपण्णी जयंत पाटील यांनी केली आहे.
त्याचवेळी जयंत पाटील यांनी अमित शाहांना सहकारी बँकांच्या स्वायत्ततेच्या प्रश्नातही लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल.
मी त्यांच्या नेमणुकीचे स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घातली आहेत. त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय तो अमित शाह दूर करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
Amit shah become co opration minister, NCP leader jayant patil targets him over banks autonomy
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo State Emergency : टोकियोमध्ये आणीबाणी लागू, मैदानावर प्रेक्षकांशिवाय होणार ऑलिम्पिक स्पर्धा
- Cairn Energy : 20 भारतीय मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त सरकारने फेटाळले, फ्रेंच कोर्टाकडून कोणताही आदेश मिळाला नाही
- चर्चा राजीनाम्याची पण दानवेंनी इथेही दिला ‘चकवा’, बढती मिळवत थेट बनले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री !
- मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले- नारायण राणेंची उंची मोठी, पण त्यांना खातं मिळालं सूक्ष्म, लघु उद्योग!
- एकनाथ खडसे म्हणाले, भोसरी भूखंडप्रकरणी माझा आणि कुटुंबीयांचा ED कडून छळण्याचा प्रयत्न