Amit Shah Amarinder singh meeting : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे 45 मिनिटे चालली. यावेळी जेपी नड्डादेखील उपस्थित असल्याची माहिती आहे. बैठकीत काय घडले याबद्दल तपशील उपलब्ध नाही. मात्र, आता अशी चर्चा आहे की, उद्या काँग्रेसचे काही मोठे नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात. ते सर्व कॅप्टनशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. Amit Shah Amarinder singh meeting lasted 45 minutes; Possibility to become Agriculture Minister in Modi Government through Rajya Sabha
प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे 45 मिनिटे चालली. यावेळी जेपी नड्डादेखील उपस्थित असल्याची माहिती आहे. बैठकीत काय घडले याबद्दल तपशील उपलब्ध नाही. मात्र, आता अशी चर्चा आहे की, उद्या काँग्रेसचे काही मोठे नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात. ते सर्व कॅप्टनशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
कॅप्टन मंगळवारी दिल्लीला पोहोचले. यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटण्यास नकार दिला होता. तरीही आता त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. अशी चर्चा आहे की, भाजप राज्यसभेच्या माध्यमातून अमरिंदर यांनाही सरकारमध्ये आणू शकते आणि त्यांना कृषी मंत्री केले जाऊ शकते.
पंजाबमधील काँग्रेस नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्याने दुष्टचक्रात अडकली आहे. अशा स्थितीत कॅप्टनच्या या बैठकीमुळे पंजाबमधील नाट्याचा आणखी एक अंक सुरू झाला आहे. कॅप्टनचा दिल्ली दौरा पंजाबच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कॅप्टन अमरिंदर यांचा अपमान झाला आणि त्यातून त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. मुख्यमंत्री म्हणून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार भेटलेले आहेत. मात्र, आता पदावर नसताना ही बैठक होत असल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
कृषी कायद्यांचा पेच सोडवून कॅप्टनसाठी मार्ग तयार होणार?
अमित शहा यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भेटीनंतर आता अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कृषी सुधारणा कायदांची अडचण सोडवून कॅप्टनसाठी मार्ग तयार केला जाऊ शकतो. कॅप्टनच्या भाजप प्रवेशाने पंजाबमध्ये पक्षाला बळकटी आणि कायद्यांना होत असलेला विरोध दूर करणे, असे दुहेरी फायदे भाजपला मिळू शकतात. कॅप्टन केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चात मध्यस्थाचीही भूमिका पार पाडू शकतात.
कॅप्टन अमरिंदर यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
कॅप्टन सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पंजाबमध्ये सुमारे महिनाभर हे आंदोलन शांततेत सुरू राहिले. यानंतर जेव्हा शेतकरी दिल्लीला गेले तेव्हाही कॅप्टन थांबले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना रोखण्याच्या केंद्र सरकारच्या सूचनाही नाकारल्या. शेतकऱ्यांशी कॅप्टनचे संबंधही चांगले आहेत. आंदोलनानंतर जेव्हा त्यांनी उसाचे भाव वाढवले, तेव्हा संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर राजेवाल, मनजीतसिंग राय आणि इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यावर राजकीय चर्चा झाली.
कॅप्टन पीएम मोदी आणि शहा यांच्या जवळचे
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जातात. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला कॅप्टनची राष्ट्रवादी शैली आवडते. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कॅप्टनने अनेकवेळा पक्षाची बाजू सोडली आहे. जेव्हा जेव्हा देश आणि लष्कराचा प्रश्न येतो तेव्हा कॅप्टन केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहतात. कॅप्टन जेव्हाही मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले, तेव्हा त्यांना पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना भेटण्याची तातडीने वेळ मिळालेली आहे.
Amit Shah Amarinder singh meeting lasted 45 minutes; Possibility to become Agriculture Minister in Modi Government through Rajya Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?
- राज्यात पाऊस आणि पुरामुळे 22 लाख हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, मी त्यांना संकटातून बाहेर काढेन!’
- मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार
- कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!
- कोविड कव्हर विम्याचे तब्बल 31,624 कोटी रुपयांचे दावे; देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विमा दावे सर्वाधिक