वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. कॅलिफोर्नियामध्ये ‘ॲमेझॉन’चे दीड लाख कर्मचारी काम करतात. यातील बहुतेक कर्मचारी त्यांच्या शंभर गोदामात काम करतात. Amezon punished by5 lakh doller
या ठिकाणी त्यांना मिळालेल्या सर्व ऑर्डरचे पॅकिंग होते आणि त्या नियोजित ठिकाणी पाठविल्या जातात. कामाच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे प्रकरण आढळल्यास इतर कर्मचाऱ्यांना आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांना एका दिवसाच्या आत कळविणे कंपन्यांना अथवा संस्थांना बंधनकारक आहे.
कंपनीने अशा प्रकारची माहिती अद्ययावत ठेवली नाही, अशी तक्रार झाली होती. कॅलिफोर्नियामध्ये नव्यानेच झालेल्या कोविड माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रशासनाने कारवाई करत कंपनीला दंड ठोठावला. कंपनीने चूक कबुल करताना दंड भरण्याची तयारी दर्शविली असून आरोग्य यंत्रणा सुधारण्याचीही हमी दिली आहे.
Amezon punished by5 lakh doller
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या शिडातून हवा काढून इतर विरोधकांच्या शिडात पुरती हवा भरली जाईल…??
- ममता आल्या, यूपीएला सुरुंग लावून गेल्या; तरी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा नि : श्वास का सोडला??
- महात्मा जोतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा ; रामदास आठवले
- स्वप्नील जोशी, पूजा सावंत ह्यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या बळी चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित