मुंबई : भारतीय रिझर्व बँकेच्या आदेशानुसार आता बँकांना कोणतेही ऑटो डेबिट पेमेंट करण्यापूर्वी त्या खातेदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. बरेच खातेदार आपल्या मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंग मधून वीज, गॅस, अशी जी बीले दर महिना भरावी लागतात ते ऑटो डेबिट मोडवर टाकत असतात. यामुळे आपण जे बिल ऑटो डेबिट मोडवर टाकले असेल ते आल्यानंतर आपल्या बँक खात्यातून ती रक्कम कापली जाते. यामुळे वेळ वाचत असला तरी काही वेळा बील जास्त येणे, न वापरलेल्या सुविधेचे चार्जेस लागणे यामुळे तोटा होउ शकतो.
Amendments to be made in auto debit payment rules, Read to know more
ऑटो डेबिटच्या नियमांत १ ऑक्टोबरपासून बदल झाला आहे. कुठल्याही डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म वर आता कुठलाही ई. एम.आय. तुमच्या खात्यातून थेट कापला जाणार नाही. अशी कपात करण्यापूर्वी संबंधित बँकेला ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोबाईल बिल, विज बिल, विमा हप्ता, ब्रॉडबँड बील यावर याचा परिणाम होणार आहे. सदर बिलांची रक्कम पाच हजाराच्या आत असेल तर असे व्यवहार रद्द केले जातील. पाच हजार वरील रकमेच्या बिलांचे पेमेंट ऑनलाइन करावे लागेल त्यासाठी डेबिट क्रेडिट कार्डचा वापर ग्राहक करू शकतो.
बँकांनी याबाबत सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. ॲक्सिस बँकेने सांगितले आहे की, आरबीआयच्या रिकरिंग पेमेंट गाईडलाईननुसार २० सप्टेंबर २०२२ नंतरच्या रिकरींग व्यवहारांसाठी अॅक्सिस बॅंक कार्डवर स्टॅंडिंग नियमांचे पालन केले जाणार नाही. ग्राहकांना सेवा पुरवठादारांना कार्ड स्वाईप करून थेट पेमेंट करावे लागेल.
नवीन नियमानुसार ग्राहकांना ऑटो डेबिट कपात होण्यापूर्वी पाच दिवस आधी एक सूचना पाठवली जाईल आणि ग्राहकांनी त्याला मान्यता दिल्यानंतरच ऑटो डेबिट पेमेंट होऊ शकेल. ग्राहकांना पाच हजाराहून जास्त रकमेच्या पेमेंट साठी वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल व त्यानंतर ऑटो पेमेंट होईल. सदर इ मॅंडेटसाठी सर्व कार्ड नेटवर्क, बॅंका यांना जोडण्यासाठी एक कॉमन व्यवस्था काम करणार आहे.
अधिल शेट्टी, बँक बाजार.कॉमचे -सीईओ म्हणाले की, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्राहकांकडे दोन पर्याय आहेत. एक- व्यापारी साईटसवर आपले सेव केलेले डेबिट, क्रेडिट कार्ड वापरून प्रत्येक महिन्याला वन टाइम पेमेंट करणे. दोन- जिथे असे वारंवार पेमेंट करावे लागते तिथे सेविंग व करंट अकाऊंट मधून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड न वापरता नेट बँकिंग पोर्टलवर वर जाऊन ऑटोपे सुचना देणे. शेट्टी म्हणाले की, पाचहजारवरील पेमेंट परत ऑथेंनटिकेट करावी लागणार आहेत.
Amendments to be made in auto debit payment rules, Read to know more
महत्त्वाच्या बातम्या
- Sachin Vaze Case : सचिन वाझेंच्या डायरीतून उलगडणार 100 कोटींचे रहस्य, प्रत्येक व्यवहाराचा होईल भंडाफोड!
- Colorado Shooting : अमेरिकेत कोलोरॅडोच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह 10 जण ठार
- कोरोना लसीकरण : कोवीशील्ड व्हॅक्सीनबाबत सरकारची नवीन गाइडलाइन, आता 4 ऐवजी 8 आठवड्यानंतर मिळणार दुसरा डोस
- Maharashtra Lockdown News : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये कोरोनाचा स्फोट; राज्यात लॉकडाऊन निश्चित ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य
- सारस्वत बँकेमध्ये १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च