• Download App
    बिहारमध्ये आता रुग्णवाहिकांचे राजकारण, राजीव प्रताप रुडी – पप्पू यादव आमने सामने।Ambulance issue erupts in Bihar politics

    बिहारमध्ये आता रुग्णवाहिकांचे राजकारण, राजीव प्रताप रुडी – पप्पू यादव आमने सामने

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये कोरोनारुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसताना आता त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोपांचा खेळही सुरु झाला आहे.
    भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या निधीतून खरेदी केलेल्या ४० रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे माजी खासदार पप्पू यादव उघडकीस आणले आहे. रुडी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या छपरामधील अमनौर येथील शेतात या रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. Ambulance issue erupts in Bihar politics



    रुग्णवाहिकेवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप यांनी पप्पू यादव यांच्यावर केला आहे. कोरोनाच्या साथीमुळे रुग्णवाहिकेच्या चालकांनी नोकरी सोडली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले होते व चालकांची व्यवस्था करून रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यास सांगितले होते, असा दावा रुडी यांनी केला आहे.

    पाटण्यात आज पप्पू यादव यांनी निवासस्थानी ४० परवान्यांसह ४० चालकांना उपस्थित करून ते सर्वजण रुग्णवाहिका चालविण्यास तयार असल्याचे सांगितले.

    Ambulance issue erupts in Bihar politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार