• Download App
    अमेझॉनचे नवीन पाऊल, मुंबई पुणे येथे गोदामे उघडणार, १.१० लाख नवीन रोजगार संधी | Amazon's new step to open new warehouses in Mumbai and Pune

    अमेझॉनचे नवीन पाऊल, मुंबई पुणे येथे गोदामे उघडणार, १.१० लाख नवीन रोजगार संधी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ई कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली  आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे,  जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे. (Fulfillment center).

    Amazon’s new step to open new warehouses in Mumbai and Pune

    अमेझॉनची राज्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे, असे अमेझॉनचा प्रवक्ता म्हणाला. सदर केंद्र ही MSME ना लघुउद्योजक, मध्यम उद्योग, व व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहाय्यक ठरतील.


    गूगल आणि जिओने भारतातील स्मार्टफोन लॉन्च करण्यास केला विलंब


    अमेझॉनच्या वितरण व्यवस्थेतील ही सेंटर्स प्रमुख भाग आहेत. सात सॉर्टिंग सेंटर तसेच वितरण सेवा पार्टनर स्टेशन आणि दुकाने ग्राहकांना उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. प्रवक्ता म्हणाला की, “अमेझॉनने या सणासुदीच्या काळात १.१० लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत. प्रवक्ता पुढे म्हणाला की, याच महिन्यात करिअर डे दिवशी अमेझॉन कंपनीने ८००० नवीन रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.”

    Amazon’s new step to open new warehouses in Mumbai and Pune

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!