विशेष प्रतिनिधी
कानपूर: तुमच्या सेवेत सदैव तत्पर हे ब्रीद भारतीय रेल्वेने प्रत्यक्षात खरे करुन दाखवले आहे. एका महिलेच्या विनंतीनंतर तिच्या बाळाला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केवळ २३ मिनिटांत गाईचे दूध उपलब्ध करून दिले.Always ready for Indian Railways service, provided cow’s milk to the baby in 23 minutes
मुंबईहून सुलतानपूरला जाणाऱ्या रेल्वेत अंजली नावाची महिला तिच्या चिमुकल्यासह प्रवास करत होती. प्रवासात बाळाला भूक लागली होती. मात्र महिलेकडे गायीचं दूध नव्हतं. अखेर या महिलेने ट्विट करत म्हटलं की, मी प्रत्येक स्टेशनवर गायीचं दूध विचारणा केली परंतु मला ते सापडलं नाही.
त्यासाठी मी विनंती करते की कृपया शक्य झाल्यास माझ्या लहान मुलासाठी गायीचं दूध उपलब्ध करुन द्यावे.या महिलेला प्रवासात येणारी अडचण पाहून रेल्वेनेही तात्काळ जेव्हा गाडी कानपूर जंक्शनला पोहचली तेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेची मागणी पूर्ण केली.
या महिलेने रेल्वे मंत्रालयाला टॅग करत ट्विट केले होते. तेव्हा तातडीने हे ट्विट कानपूर सेन्ट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय यांना पाठवून सूचित करण्यात आले. तब्येत ठीक नसल्याने हिमांशु शेखर घरीच होते. परंतु ट्विट मिळताच त्यांनी रेल्वे टीमला सक्रीय केले.
त्यानंतर जेव्हा महिला प्रवास करत असणारी गाडी कानपूर स्टेशनला पोहचली तेव्हा अंजलीला गायीचं दूध पाहून सुरुवातीला विश्वास बसला नाही. रेल्वे अधिकारी स्वत: हे दूध घेऊन महिलेच्या प्रतिक्षेत होते.
या घटनेने महिला भारावली होती. त्यानंतर जेव्हा ही महिला सुलतानपूरला तिच्या गावात पोहचली. तिने रेल्वे अधिकाºयांना फोन करुन धन्यवाद दिले.या घटनेवर कानपूर सेंट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की, ही महिला तिच्या लहान बाळासह एकटी प्रवास करत होती.
त्यावेळी तिची मदत करणं गरजेचे होते. आम्हालाही या महिला रेल्वे प्रवाशाची मदत करुन आनंद झाला. रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत असंही त्यांनी सांगितले.
Always ready for Indian Railways service, provided cow’s milk to the baby in 23 minutes
महत्त्वाच्या बातम्या
- हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाचे ‘आॅस्कर’ नामकरण वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात कार्यक्रम
- उर्दू शाळांमध्ये द्वैभाषिक पुस्तके सुरू करावीत शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची सुचना
- मुंबई नौदल डॉकयार्ड मध्ये स्फोट; 3 खलाशी ठार 11 जवान जखमी; INS रणवीरच्या बोर्डवरील दुर्घटना
- ८२ टक्के कर्मचारी नोकऱ्या बदलण्याच्या विचारात कोरोना महामारीमुळे आत्मविश्वासावर परिणाम