• Download App
    18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या : तरुणांना नोकरीच्या संधी बरोबरच मोदी प्रशासनाचा वेग, गुणवत्ता वाढविण्याचाही प्रयत्न!! Along with job opportunities for the youth, the speed of the Modi administration

    18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या : तरुणांना नोकरीच्या संधी बरोबरच मोदी प्रशासनाचा वेग, गुणवत्ता वाढविण्याचाही प्रयत्न!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी रोजगार नोकऱ्या देणे हा उपक्रम सुरू झाला आहे. यासाठी केंद्र सरकारने धनत्रयोदशीचा उत्तम मुहूर्त निवडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरात विविध शहरांमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये 75 हजार युवकांना रोजगार नोकऱ्यांची प्रमाणपत्रे वाटली. परंतु, हा त्यापलिकडचा तब्बल 10 लाख युवकांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा उपक्रम आहे
    Along with job opportunities for the youth, the speed of the Modi administration

    या उपक्रमाद्वारे तरुणांना सरकारी नोकरीची संधी देण्याबरोबरच मोदी सरकारच्या प्रशासनात वेग, गुणवत्ता आणि नाविन्य आणण्याचा देखील यातून प्रयत्न होत आहेत. कारण केंद्र सरकारची तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजाच्या वेगावर झाला आहे, तसेच त्यामुळे गुणवत्तेलाही धक्का पोहोचतो आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने 18 महिन्यात जेव्हा रिक्त पदे भरली जातील, तेव्हा नव्या तंत्र आणि तंत्रज्ञान शिकून तयार झालेले युवक प्रशासनातील वेगवेगळ्या स्तरांवरची पदे भूषवतील, त्याचा परिणाम कामाची गुणवत्ता आणि वेग वाढविण्यावर होईल. परिणामी संपूर्ण प्रशासन गतिमान करण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. ही राजकीय पार्श्वभूमी रोजगार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यामागे आहेच. ती नाकारण्याचे कारण नाही. पण त्याहीपेक्षा प्रशासनात दीर्घकाळासाठी नाविन्य आणणे आणि प्रशासन वेगवान करणे हा महत्त्वाचा भाग यातून साध्य होणार आहे.


    केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; महागाई भत्त्यापाठोपाठ प्रवास भत्ता आणि श्रेणीही वाढणार


    केंद्र सरकारच्या विविध 38 खात्यांच्या रिक्त जागा भरण्याच्या या उपक्रमातून येत्या 18 महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख युवकांना यातून रोजगार नोकरी उपलब्ध होणार आहेत.

    केंद्र सरकार आपल्या 38 विभागांमधील सर्व रिक्त पदे येत्या 18 महिन्यांमध्ये भरणार असून यासाठी युद्ध स्तरावर काम सुरू आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या सेवेतील अ, ब (राजपत्रित) ब (राजपत्रित) क या श्रेणीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रीय सशस्त्र बल कार्मिक, उपनिरीक्षक, काँन्स्टेबल, कनिष्ठ लिपिक (एलडीसी), स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, रेल्वे एमटीएस आदी पदांचाही समावेश आहे.

    गेल्या 7 वर्षांमध्ये तब्बल 7 लाख 22 हजार युवकांना केंद्र सरकारने रोजगार नोकऱ्या दिल्या पण 1 मार्च 2020 च्या आकडेवारीनुसार 8 लाख 72 हजार पदे आजही रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम सुरू आहे. यासाठी कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच मंत्र्यांची एक सदस्य समिती गठित करून त्याद्वारे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया निश्चित केली गेली. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचा समावेश आहे.

    येत्या 18 महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत विविध मंत्रालयांच्या गरजेनुसार ही नोकर भरती केली जाणार आहे यासाठी यूपीएससी एसएससी तसेच रेल्वे भरती बोर्ड या एजन्सीचा वापर केला जाणार आहे. यातली जास्तीत जास्त भरती प्रक्रिया ऑनलाइन केली असून ती तांत्रिकदृष्ट्या सुलभ असणार आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये या भरती प्रक्रियेच्या अधिकृत जाहिराती सरकारच्या अधिकृत वेब पोर्टलवरून प्रकाशित केल्या जातील. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवून ती जास्तीत जास्त ऑनलाईन ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    Along with job opportunities for the youth, the speed of the Modi administration

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!