• Download App
    आम आदमी पार्टी वरचे आरोप गंभीर; अमित शहांनी घातले लक्ष; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र!! Allegations against Aam Aadmi Party are serious

    आम आदमी पार्टी वरचे आरोप गंभीर; अमित शहांनी घातले लक्ष; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात त्यांचेच माजी सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनी जे गंभीर आरोप केले होते, त्याची दखल दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. या आरोपांचा संदर्भातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अमित शहा यांना पत्र पाठविले होते. या पत्राचे उत्तर अमित शहा यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना पाठवले आहे. आपण स्वतः या गंभीर आरोपांबाबत चौकशी आणि तपासात लक्ष घालतो आहोत, असे आश्वासन अमित शहा यांनी त्यांना दिले आहे.
    Allegations against Aam Aadmi Party are serious

    पंजाब मध्ये सामाजिक फूट पाडून आपण पंजाबचे मुख्यमंत्री होऊ किंवा स्वतंत्र खलिस्तानचे पहिले पंतप्रधान तरी होऊ, असे विधान अरविंद केजरीवाल यांनी आपल्याशी बोलताना केले होते, असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर असून तो थेट देशाच्या एकात्मतेची संबंधित आहे. या बाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

    पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ही प्रतिबंधित संघटना “सिख फॉर जस्टिस” या संघटनेशी संधान साधून असल्याचा आरोप चरणजीत सिंग चन्नी यांनी केला होता. या आरोपांची केंद्रीय तपास संस्थांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. चरणजीत सिंग चन्नी यांच्या पत्राला उत्तर देऊन अमित शहा यांनी या गंभीर बाबीकडे आपले लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात त्यांनी या पत्रात आम आदमी पार्टीचे थेट नाव घेतलेले नाही तरीदेखील त्यांचा रोग कशावर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.

    पंजाब मध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान आहे राज्यातला प्रचार आज संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र उत्तर पाठवणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

    Allegations against Aam Aadmi Party are serious

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!