विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर एमआयएमआयचे असुद्दिन ओवेसी यांच्यापासून कॉँग्रेससह सर्व सर्व राजकीय पक्ष एकत्र असून, विरोधी पक्षांनीही सरकारसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. All political parties, from Owaisi to the Congress, have come together on the issue of Afghanistan.
भारताने तालिबानबाबत वेट अॅँड वॉचची भूमिका घेतली होती. अफगाणिस्तानबाबत विरोधी पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत ३१ पक्षांचे ३७ नेते उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, अफगणिस्थानच्या मुद्द्यावर सर्वांची एकच भूमिका आहे.
अफगाणिस्तानच्या लोकांची सर्वांनाच काळजी आहे. अफगाण लोकांशी असलेली मैत्री देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बैठकीत प्रत्येक विरोधी पक्षाच्या सदस्याने आपले म्हणणे मांडले. सर्वांनाच बचाव मोहिमेबाबत सविस्तर माहिती हवी होती. अफगाणिस्तानातून मिशन देवी शक्तीद्वारे ५६५ भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. अजूनही काही भारतीय तेथे अडकलेले आहेत. त्यांनादेखील लवकरच परत आणण्यात येईल.
एस. जयशंकर यांनी सांगितले की, तालिबानने दोहामध्ये दिलेला शब्द पाळला नाही. आतापर्यंत अफगाणिस्तानातील १५ हजार लोकांनी भारत सरकारच्या मदत कक्षाशी संपर्क साधला आहे. काबूलमधील स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अफगाण नागरिकही भारतात येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी नवी ई-व्हिसा पॉलिसी आणली आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले, की देशहिताबाबत प्रत्येक निर्णयासाठी आम्ही सरकारसोबत आहोत.
All political parties, from Owaisi to the Congress, have come together on the issue of Afghanistan.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
- सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
- Bengal Post Poll Violence : सीबीआयने 9 केसेस नोंदवल्या; लवकरच तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांच्या चौकशीची शक्यता
- All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, 565 जणांना आणले
- पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी