वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने काही तासांसाठी युद्धबंदी जाहीर केली त्याआधीच खारकीव्ह मधून भारतीय विद्यार्थी सुरक्षित बाहेर पडले आहेत. आता खारकीव्ह मध्ये कोणीही भारतीय उरलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज स्पष्ट केले. त्यामुळे आता सुमी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अरिंदम बागची यांनी सांगितले.All Indians safely out of Kharkiv
सुमी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी दुपारी एक व्हिडिओ जारी करून गेले 10 दिवस रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. आम्ही 600 भारतीय विद्यार्थी सुमी विद्यापीठात अडकलेलो आहोत. आता आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता बाहेर पडणार आहोत. आमच्या पैकी कोणाला काही झाले तर भारतीय दूतावास आणि भारतीय सरकारची जबाबदारी असेल. कारण इथे मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफांचा भडीमार सुरु आहे. हा आमचा शेवटचा व्हिडिओ आहे, असे जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने ताबडतोब आपली टीम ऍक्टिव्हेट केली असून लवकरात लवकर ते शहर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तिथे चाललेला गोळीबार आणि तोफांचा भडिमार यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळे येत आहेत. खारकीव्ह पासून सुमी शहर जवळ 600 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून भारतीय विद्यार्थ्यांना जवळच्या रशियन सीमेवर केले जाईल आणि तेथून भारतात सुरक्षित आणले जाईल अशा प्रकारची योजना बनवण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा यांचा अडथळा येत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट करून रशिया आणि युक्रेन दोन्ही बाजूंना शांतता राखून मानवी कॉरिडॉर नव्याने तयार करण्याचे आवाहन केले आहे.
All Indians safely out of Kharkiv
महत्त्वाच्या बातम्या
- Pune Metro fare : पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त… पहा भाडे किती?
- Sharad Pawar – Nawab Malik : नवाब मलिकांच्या अटकेची शरद पवारांकडून नारायण राणेंच्या अटकेशी तुलना…!!
- PM Modi – Sharad Pawar : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा राष्ट्रवादीला नेमका कुठे खुपतोय…
- Sharad Pawar : राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशात फिरकलेही नाहीत, पण निकालाबाबत ज्योतिषाचा आधार घेत नाही, म्हणाले!!