क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने करण जोहरने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली.
या पार्टीत आलिया भट्ट देखील सामील होती.आलिया भट्ट हीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता पण तिला क्वारंटाईन होण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आलिया बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी गेली होती.दरम्यान यावेळी तिने तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले.आलिया भट्ट चार्टर विमानाने आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. आलिया मुंबईत येताच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना बजावलेले समन्स रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
- बदल्यांमधील भ्रष्टाचाराचा अहवाल दिल्यामुळेच बळीचा बकरा बनवले जातेय, रश्मी शुक्ला यांचा राज्य सरकारवर आरोप
- भारतीय मेजरचा चीनी सैनिकाला सवाल, तुला लाज नाही वाटत?
- बीडला आलात तर पाहू, धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी येत असलेल्या किरीट सोमय्या यांना धमक्या