देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँक ग्राहकांच्या खात्यांशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांनी वेळेवर जर ही कामे केली नाहीत, तर त्यांना अकाउंट बंद होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. Alert For SBI customers have to do this work by September 30, otherwise your account will be closed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँक ग्राहकांच्या खात्यांशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांनी वेळेवर जर ही कामे केली नाहीत, तर त्यांना अकाउंट बंद होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.
सीबीआयने म्हटले की, तुम्हाला फक्त तुमचा पॅन म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर 30 सप्टेंबरपूर्वी आधार क्रमांकाशी जोडावा लागेल. दुसरीकडे, आयकर विभागानेदेखील इशारा दिला आहे की, जर पॅन कार्ड 30 सप्टेंबरपर्यंत आधारशी जोडले नाही, तर ते निष्क्रिय होऊ शकते.
याशिवाय असे न केल्याने प्राप्तिकर कायद्याअंतर्गत 1,000 रुपयांचा दंडदेखील भरावा लागू शकतो. अगदी अलीकडेच, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, जर कोणतीही व्यक्ती पॅनला आधारशी जोडण्यात अपयशी ठरली तर यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तसेच अधिसूचनेमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जर मुदतीनंतर पॅन आधार कार्डाशी जोडलेले असेल तर आधार क्रमांक लिंक करण्याची तारीख कळवल्यानंतर पुन्हा पॅन कार्ड वापरता येईल.
असे करू शकता पॅनला आधारशी लिंक
- यासाठी प्रथम तुम्हाला आयकर ई-फाइलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल.
- त्यानंतर क्विक लिंक विभागात जाऊन ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि तुमच्या आधारमध्ये दिलेल्या नावाचा उल्लेख करा.
- यानंतर, आता तुम्ही तुमच्या आधारमध्ये असलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर लिहा.
- आता तुम्हाला एक OTP मिळेल.
- जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नसेल, तर तुम्ही इथे ‘आधार कार्डमध्ये माझे फक्त जन्म वर्ष आहे’ असे लिहू शकता.
- आता ‘मी UIDAI बरोबर माझे आधार तपशील प्रमाणित करण्यास सहमत आहे.” यावर टीक करा.
- आता सत्यापनासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा. नंतर आधार लिंक निवडा.
- आता तुमचा आधार पॅन कार्डाशी जोडला गेला आहे.
एसएमएसद्वारे कसे कराल लिंक?
- जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल, तर तुम्ही SMSद्वारे तुमचे PAN आधारशी लिंक करू शकता.
- यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये UIDPAN लिहून जागा द्यावी लागेल.
- नंतर तुम्ही 12 अंकी आधार क्रमांक लिहून जागा सोडा.
- शेवटी, तुम्ही 10 अंकी पॅन म्हणजेच कायम खाते क्रमांक लिहा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 567678 किंवा 56161 वर पाठवा.
महत्त्वाच्या बातम्या
- लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर
- अमरसिंह यांच्या सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली पक्षाची सूत्रे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्याही पाया पडू नका असा चाणक्यांनी दिला होता मंत्र
- उत्तर प्रदेशात १९ हिंदूंना शुध्दीकरण करून पुन्हा घेतले हिंदू धर्मात, बंजारा बांधवांचे झाले होते जबरदस्तीने धर्मांतर
- पारदर्शकतेची कमाई, भाजपाला इलेक्ट्रोरेल बॉँडच्या माध्यामतून मिळाली २,५५५ कोटी रुपयांची देणगी