Thursday, 8 May 2025
  • Download App
    Alert For Customers : एलआयसीने कामाच्या दिवसांत केला मोठा बदल, 10 मेपासून लागू । Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th

    Alert For LIC Customers : एलआयसीने कामाच्या दिवसांत केला मोठा बदल, 10 मेपासून लागू हे नियम

    Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th

    Alert For LIC Customers : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) म्हटले आहे की, १० मेपासून त्यांची सर्व कार्यालये आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारीही विमा कंपनीला सुटी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 15 एप्रिल 2021 रोजीच्या अधिसूचनेत जाहीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने प्रत्येक जीवन-विमा महामंडळासाठी दर शनिवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत सर्व पॉलिसीधारक व इतरांना हे सूचित केले जात आहे की, 10 मेपासून सर्व एलआयसी कार्यालये सोमवार ते शुक्रवारदरम्यान कार्यरत असतील. Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) म्हटले आहे की, १० मेपासून त्यांची सर्व कार्यालये आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारीही विमा कंपनीला सुटी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 15 एप्रिल 2021 रोजीच्या अधिसूचनेत जाहीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने प्रत्येक जीवन-विमा महामंडळासाठी दर शनिवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत सर्व पॉलिसीधारक व इतरांना हे सूचित केले जात आहे की, 10 मेपासून सर्व एलआयसी कार्यालये सोमवार ते शुक्रवारदरम्यान कार्यरत असतील.

    काय आहे नवा नियम?

    नवीन नियमांतर्गत एलआयसी कार्यालयात 10 मेपासून सुरू होणार्‍या आठवड्यात फक्त 5 दिवस काम केले जाईल. आता शनिवारी दर आठवड्याला सार्वजनिक सुटी म्हणूनही मानले जाईल. याचा अर्थ असा की, आता जर आपण शनिवारी एलआयसीच्या कार्यालयात गेला तर आपल्याला परत यावे लागेल. आता तुम्हाला आपल्या कामासाठी एलआयसी कार्यालयात जायचे असेल, तर सोमवार ते शुक्रवारदरम्यानच जाता येईल. यापूर्वी साप्ताहिक सुटी केवळ रविवारी दिली जात होती, परंतु आता नवीन नियमानंतर सलग दोन दिवस सुटी असेल.

    काय असेल टायमिंग?

    नवीन नियमानुसार एलआयसी कार्यालयात कामकाजाचा कालावधी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत असेल. याशिवाय शनिवार आणि रविवारी सुटी असेल. अलीकडेच, सरकारने नेगोशिटेबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881च्या कलम 25 अंतर्गत दिलेल्या शक्तीच्या आधारे हा बदल केला आहे. यापूर्वी असेही वृत्त होते की, एलआयसी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाईल. याचा फायदा एलआयसीच्या सुमारे 1.14 लाख कर्मचार्‍यांना होईल.

    Alert for LIC customers, LIC Office Timings are changing From May 10th

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी

    Icon News Hub