वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : टेस्ला प्रवर्तक एलनस यांनी ट्विटर कंपनी खरेदी चे 44 अब्ज डॉलरचे डील तोडून टाकले आहे. ट्विटर कंपनीने अकाउंट बाबत आपल्याला हवी तशी माहिती दिलेली नाही. माहिती शेअर करण्यामध्ये बरीच कुचराई झाली आहे. त्यामुळे अखेर ट्विटर कंपनी खरेदी करण्याचे डील तोडावे लागत आहे, असे एलन मस्कच्या टीमने जाहीर केले आहे.Alan Musk: company 44 billion deal to buy Twitter company broken !!
एप्रिल 2022 मध्ये एलन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी करण्याचे डील केले होते. ट्विटर कंपनीचे सगळे शेअर एलन मस्कच्या कंपनीच्या नावाने करण्यासाठी तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. हे डील पक्केही झाले होते.
परंतु ट्विटर मधल्या अकाउंट व्हेरिफिकेशन संदर्भात एलन मस्क यांनी जी माहिती मागवली होती, ती माहिती पुरेशी देण्यात आली नाही. ट्विटरने त्यांना ट्विटर वरील 5 % अकाउंट स्पॅम असल्याचे सांगितले. परंतु याबाबतचा अधिक खुलासा त्यांनी मागवून घेतला होता. एलन मस्कच्या टीमच्या मतानुसार 90% अकाउंट स्पॅम आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक तपशीलवार माहिती अपेक्षित केली होती. त्यावेळेचे ट्विटरचे सीईओ पराग आगरवाल यांनी संबंधित माहिती एलन मस्कना शेअर करण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही माहिती सादर झाली नसल्याचे एलन मस्कच्या टीमने स्पष्ट केले. अखेर 9 जुलै 2022 रोजी ट्विटर कंपनी खरेदी करण्याचे 44 अब्ज डॉलरचे डील तोडून टाकले.
Alan Musk: company 44 billion deal to buy Twitter company broken !!
महत्वाच्या बातम्या
- अमरनाथ मध्ये ढगफुटी : 10 यात्रेकरू भाविकांचा मृत्यू; एनडीआरएफचे मदत कार्य वेगात
- महाराष्ट्रात वीज दरात मोठी वाढ; पुढील 5 महिन्यांसाठी निर्णय!!
- महाराष्ट्रात 17 जिल्ह्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; पण ओबीसी आरक्षणाचे काय??
- महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यावर प्रथमच नितीन गडकरींचे भाष्य : शिंदेंना असे अमृत पाजले की, त्यांना अमरत्व प्राप्त!!