प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपला जोरदार गळती लावून 3 मंत्री आणि 8 आमदार समाजवादी पक्षाच्या गळाला लावले आहेत. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाचे वातावरण आहे. Akhilesh’s recruitment in Samajwadi Party but the poll vote percentage dropped !!
अखिलेश यादव यांनी स्थानिक पातळीवरच्या छोट्या पक्षांशी युती करून मोठी झेप घेण्याचा मनसुबा आखला आहे. परंतु अखिलेश यांच्या या मनसुब्यांच्या फुग्याला मतदार राजा मात्र टाचणी लावताना दिसत आहे.
एबीपी सी वोटर सर्वेक्षणात समाजवादी पक्षाची मतांची टक्केवारी घटताना दिसत आहे, तर भाजपची टक्केवारी पक्षातील नेत्यांच्या गळती नंतरही वाढताना दिसत आहे. सर्वेक्षणाच्या ताज्या आकड्यांनुसार उत्तर प्रदेशात भाजपच पुन्हा सत्तेवर येईल असे 50% मतदारांना वाटते, तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष सत्तेवर येईल असे मत 28 % मतदारांनी व्यक्त केले आहे. 23 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये एबीपी सी वोटरने 3 सर्वे घेतले. या प्रत्येक सर्व्हेमध्ये भाजपची टक्केवारी स्थिर अथवा वाढलेली दिसली आहे, तर समाजवादी पक्षाची टक्केवारी घटलेली दिसली आहे.
6 जानेवारीच्या सर्वेत भाजपला 48 % मते होती, तर 13 जानेवारी च्या सर्व भाजप किमती दोन टक्क्यांनी वाढून 50 % वर पोहोचला. त्याच सर्वेत समाजवादी पक्षाची टक्केवारी सहा जानेवारीला 31 % होती ती घटून 13 जानेवारीला 28 % वर आली आहे. याचा अर्थ भाजपमध्ये गळती आणि समाजवादी पक्षात भरती झाली असली तरी प्रत्यक्षात मतदार राजाने मात्र भाजपलाच अधिक कौल दिल्याचे स्पष्ट होत आहे. बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्या मतांची टक्केवारी 15 % च्या आत किंबहुना सिंगल डिजिट टक्केवारीत दिसून येत आहे.
Akhilesh’s recruitment in Samajwadi Party but the poll vote percentage dropped !!
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : संजय राऊत यांचा मोठा दावा, आणखी 10 मंत्री देणार राजीनामे, निवडणुकीची दिशा बदलली!
- बंगालमध्ये वाढत्या कोरोनावर उच्च न्यायालयाची कठोर भूमिका, निवडणूक आयोगाला पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश
- Corona Update : कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये ६.७ टक्क्यांनी वाढ, गेल्या २४ तासांत २ लाख ६४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
- मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी, तब्येत बरी व्हावी ही इच्छा : चंद्रकांत पाटील; तूर्त पदभार दुसऱ्याकडे देण्याचा सल्ला