• Download App
    अखिलेश यादव यांचा धर्मांध निजाम निवडाल की योगी- मोदी सरकारचा विकासाचा निजाम, अमित शाह यांचा सवाल|Akhilesh Yadav's fanatical Nizam or Yogi- Modi government's development Nizam, Amit Shah's question

    अखिलेश यादव यांचा धर्मांध निजाम निवडाल की योगी- मोदी सरकारचा विकासाचा निजाम, अमित शाह यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : निजाम शब्दाचा अर्थ चांगले प्रशासन असा होतो. पण अखिलेश यादव यांच्यासाठी एन म्हणजे नसिमुद्दीन, ई म्हणजे इम्रान मसूद आणि आ म्हणजे आझम खान आणि एम म्हणजे मुख्तार अन्सार आहे.Akhilesh Yadav’s fanatical Nizam or Yogi- Modi government’s development Nizam, Amit Shah’s question

    मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही अखिलेश यादव यांचा निजाम निवडाल की योगी-मोदी यांच्या सरकारचा विकासाचा निजाम निवडाल? असा सवाल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केला आहे.



    अमित शाह हे या निवडणुकांसाठी सध्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेत आहेत. आज मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर देखील निशाणा साधला.

    शाह म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये आधीच्या सरकारच्या काळात तब्बल ७०० दंगली झाल्याच्. आत्ताच्या सरकारने दंगलखोलांवर वचक बसवला आहे. अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ७०० दंगली झाल्या. मात्र, आज योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात दंगलखोरांची डोळे वर करून बघण्याची हिंमत होत नाही.

    मायावतींवर हल्ला करताना शाह म्हणाले, सपा-बसपा विकासाची कामे करू शकत नाहीत. मला बेहेनजींना(मायावती) सांगायचंय की त्यांनी आता तरी जरा बाहेर पडावं, कारण निवडणुका जवळ येत आहेत. नाहीतर त्या नंतर म्हणतील, त्यांनी फारसा प्रचार केला नाही. बुआ-बबुआ- काँग्रेस एकत्र लढले, तरी ते निवडणुका जिंकू शकणार नाहीत.

    Akhilesh Yadav’s fanatical Nizam or Yogi- Modi government’s development Nizam, Amit Shah’s question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक