उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेससोबत आघाडी करून समाजवादी पार्टीने पायावर धोंडा पाडून घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत ही चूक करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. कमकुवत कॉँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.Akhilesh Yadav has made it clear that the Samajwadi Party will not make the mistake of the last time and will not ally with the weak Congress
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेससोबत आघाडी करून समाजवादी पार्टीने पायावर धोंडा पाडून घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत ही चूक करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. कमकुवत कॉँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस कुमकुवत असल्याचं सांगत स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अखिलेश यादव म्हणाले, मोठ्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. आता मी त्यांच्यासोबत आघाडी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. ह्लभाजपाचा पराभव करण्याची ज्यांची इच्छा आहे. मी त्यांना आवाहन करेन की, त्यांनी समाजवादी पाटीर्ला पाठिंबा द्यावा.
अखिलेश यादव म्हणाले, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष प्रचंड कुमकुवत झाला आहे. २०१७ मध्ये त्यांच्यासोबतचा माझा अनुभव चांगला नाही. आम्ही त्यांना १०० जागा दिल्या, पण जिंकू शकलो नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेनं काँग्रेसला नाकारले आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने 403 जागांपैकी तब्बल 325 जागा जिंकल्या. त्यावेळी सत्ताधारी असलेल्या समाजवादी पार्टीचा दारुण पराभव झाला होता. समाजवादी पक्षास ४७ तर कॉँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पार्टी आणि कॉँग्रेसची आघाडी असूनही त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते.
बहुजन समाज पक्षाला १९ जागा मिळाल्या.उत्तर प्रदेशात मोदी लाट आली होती. यापूर्वी मुस्लिमबहुल भागात कुठेही भाजपला जागा मिळत नव्हती, मात्र यावेळी देवबंद, दादरी, अलिगड आणि कैराना या भागात भाजपचं कमळ फुललं. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेशात भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता, तरीही याठिकाणी भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला.