• Download App
    प्रियाकांच्या "मुख्यमंत्रिपदा"पाठोपाठ अखिलेश यादवांचा "तडाखेबंद" दावा;उत्तर प्रदेशात 403 पैकी 400 जागा जिंकू!! Akhilesh yadav claimed, samajwadi party will win 400 seats in UP polls

    प्रियाकांच्या “मुख्यमंत्रिपदा”पाठोपाठ अखिलेश यादवांचा “तडाखेबंद” दावा;उत्तर प्रदेशात 403 पैकी 400 जागा जिंकू!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुका अजून सात – आठ महिने लांब असताना सत्तास्पर्धा जबरदस्त वाढली असून त्यामध्ये नेत्यांचे दावे-प्रतिदावे पतंगासारखे आकाशात उंच – उंच उडू लागले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेश तिवारी यांनी परस्पर प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार “ठरवून टाकून” सत्तास्पर्धा वाढविल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील आपण यात कुठेही मागे नाही, असे दाखवण्यासाठी एक अजब दावा करून टाकला आहे. Akhilesh yadav claimed, samajwadi party will win 400 seats in UP polls

    उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 403 पैकी 400 जागा जिंकेल असा त्यांचा दावा आहे. हा दावा ऐकून समाजवादी पार्टीच्या विरोधकांच्या “पोटात गोळा” आला आहे. एकट्या समाजवादी पार्टीने 400 जागा जिंकल्या तर बाकीच्या पाच पक्षांमध्ये फक्त तीनच जागा उरतात, अशी अखिलेश यादव यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

    समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते जनेश्वर मिश्र यांच्या जयंतीनिमित्त समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात सायकल रॅली काढली. त्यापैकी लखनऊत सायकल रँलीत अखिलेश यादव सायकल चालवत सहभागी झाले.

    त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर सडकून टीका केली. कोरोना पासून महागाई पर्यंतच्या मुद्द्यांवर त्यांनी योगी सरकारला धारेवर धरले. पण त्याच वेळी त्यांनी 403 पैकी 400 जागा जिंकण्याचा अजब दावा केला. उत्तर प्रदेशच्या जनतेमध्ये योगी सरकार विरुद्ध एवढा प्रचंड रोष आहे की आपण म्हणजे समाजवादी पक्ष त्यांच्याविरोधात मजबुतीने उभे राहिलो तर 403 पैकी 400 जागा जिंकू असे ते म्हणाले.



    अखिलेश यादव यांच्या या अजब दाव्यानंतर सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. “गेल्या पाच वर्षात महोदय आपण कोठे होतात?” “कोरोना काळात आपण कुठे दिसला नाहीत?” असे टीकास्त्र सोशल मीडिया वरून त्यांच्यावर सोडण्यात आले आहे.

    अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर विविध समाज यांची नावे घेऊन देखील टीका केली आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने ब्राह्मण, मुसलमान, ओबीसी, ठाकूर या सगळ्या समाजांचे वाटोळे केले आहे. यापैकी कोणताही समाज त्यांच्या पाठीशी आता उभा राहणार नाही, असा अखिलेश यादव यांनी दावा केला आहे.

    “उत्तर प्रदेश का यह जनादेश आ रहे हे अखिलेश” ही समाजवादी पार्टीची निवडणूक घोषणा आहे. ठिक ठिकाणी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून ही घोषणा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.

    Akhilesh yadav claimed, samajwadi party will win 400 seats in UP polls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- माझ्याकडे अमित शहांविरोधात पेन ड्राइव्ह; मला छेडाल तर सोडणार नाही

    Land-for-Job Case: लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबासह 40 जणांवर आरोप निश्चित; लालू-राबडी, तेजस्वी-मीसा, हेमा-तेजप्रताप यांच्यावर खटला चालणार

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत