• Download App
    राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा|Akhilesh Yadav announces free electricity in Uttar Pradesh

    राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या अर्थकारणाची गेल्या पाच वर्षांत बसलेली घडी पुन्हा विस्कटण्याची पूर्ण तयारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.Akhilesh Yadav announces free electricity in Uttar Pradesh

    २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास, यूपीच्या सर्व वीज ग्राहकांना ३०० युनिट मोफत घरगुती वीज देण्याची घोषणा अखिलेश यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



    नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पक्ष कार्यालयात मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले, पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेलं हे पहिलं वचन आहे. यूपीच्या लोकांना माहिती आहे, की सपा आपल्या जाहीरनाम्यातील सर्व वचनांची पुर्ती करत असतो.

    त्यामुळे हेही वचन पूर्ण करेल. यूपीत विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलेल, त्या दिवसांपासून समाजवादी पक्ष जनतेच्या सेवेसाठी उभा असेल. सत्ताधारी भाजपने आपल्या चुकीच्या कारभारामुळं समाजातील सर्व घटकांचं जगणं मुश्किल बनवलंय, अशी त्यांनी टीका करत जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

    समाजवादी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये एक मोठी मोहीम सुरू केली होती. यामध्ये कार्यकर्त्यांना पक्षाच्या जाहीरनाम्यात काय समाविष्ट करावं, हे सुचवण्यास सांगितलं. यावर कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत विजेचे प्रति युनिट दर कमी करावेत, रा

    ज्यभरातील घरगुती ग्राहकांसाठी मर्यादित मोफत वीज द्यावी आणि शेतकºयांना सिंचनासाठी मोफत वीज द्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होती. त्यानंतर अखिलेश यादव आर्थिक बाबी लक्षात घेऊन अशा मागणीची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी आर्थिक तज्ञांशी चर्चा केली. समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर, सर्व घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Akhilesh Yadav announces free electricity in Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!