• Download App
    कोणतीही प्रचारसभा न घेता अखिल गोगोईना मिळाली ५७ हजार मते, तुरुंगात राहूनच मिळवला विजय|Akhil gogoi win election from jail

    कोणतीही प्रचारसभा न घेता अखिल गोगोईना मिळाली ५७ हजार मते, तुरुंगात राहूनच मिळवला विजय

    विशेष प्रतिनिधी

    शिवसागर : आसामच्या शिवसागर मतदारसंघातील सीएए विरोधी आंदोलक आणि तुरुंगात असणारे राइजोर पक्षाचे संस्थापक अखिल गोगोई यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे.Akhil gogoi win election from jail

    त्यांनी भाजपचे उमेदवार सुरभी राजकुंवर यांचा पराभव केला. कोणतीही प्रचारसभा न घेता सुरभी यांचा त्यांनी ११,८७५ मतांनी पराभव केला.राइजोर दलाचे संस्थापक अखिल गोगोई हे सध्या राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली डिसेंबर २०१९ पासून तुरुंगात आहेत.



    एनआयएने त्यांना सीएएविरोधात आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी अटक केली. विधानसभा निवडणुकीत त्यांना ५७,२१९ मते मिळाली. याप्रमाणे मतदारसंघातील सुमारे ४६.०६ टक्के मिळाली.

    माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी तुरुंगातून जनतेसाठी अनेक पत्रे लिहिली आणि राज्यातील प्रश्नां ना वाचा फोडण्याचे काम केले. विशेष म्हणजे अखिल गोगोई यांच्या ८५ वर्षाच्या आईने मुलासाठी शिवसागरच्या अरुंद गल्ल्यात फिरून प्रचार केला.

    गुवाहटीतील कॉटन कॉलेजचे विद्यार्थी राहिलेले ४६ वर्षीय अखिल गोगोई यांनी राइजोर पक्षाची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी १९९५-९६ मध्ये कॉटन महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेच्या विविध पदावर काम केले.

    अनेक वर्षे भ्रष्टाचारविरोधी आंदोलक म्हणून काम करणारे अखिल गोगोई यांनी कृषक मुक्ती संग्राम समितीच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केले.

    Akhil gogoi win election from jail

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल