• Download App
    अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचे ब्राह्मण लांगूलचालन, पण कोणती विकास योजना आणून नव्हे, तर परशुरामाचे पुतळे उभारून!!|akhiesh yadav`s samajwadi party to install 108 feet Bhagwan Parashuram statue in lucknow for brahmin votes

    अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचे ब्राह्मण लांगूलचालन, पण कोणती विकास योजना आणून नव्हे, तर परशुरामाचे पुतळे उभारून!!

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाचे लांगूलचालन चालविले आहे पण त्यांच्यासाठी कोणती विकास योजना आणून नव्हे, तर भगवान परशुरामाचे पुतळे जिल्ह्या – जिल्ह्यांमध्ये उभारून हे लांगूलचालन चालविले आहे.akhiesh yadav`s samajwadi party to install 108 feet Bhagwan Parashuram statue in lucknow for brahmin votes

    बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण महासंमेलने आयोजनाचा सपाटा लावल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी पक्षाने भगवान परशुराम पुतळे उभारण्याची योजना सुरू केली आहे.



    3ऑक्टोबर महिन्यात लखनौत भगवान परशुरामाचा १०८ फुटी पुतळा उभारण्याचा भव्य कार्यक्रम होणार असून त्याला पश्चिम बंगालच्या कायस्थ ब्राह्मण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित राहणार आहेत. यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असून पूर्वांचल एक्सप्रेस वे वर मौरा गावानजीक दोन बिघे जमीन देखील निश्चित करण्यात आली आहे.

    प्रख्यात मूर्तिकार राजकुमार पंडित यांना परशुराम पुतळा तयार करण्याचे काम देण्यात आले. हा ब्राँझचा १०८ फुटी पुतळा असेल. राजकुमार पंडित यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा लखनौतला भव्य पुतळा घडविला आहे.

    समाजवादी पार्टीचे ब्राह्मण नेते आणि लंभुआचे माजी आमदार संतोष पांडेय यांचे चिरंजीवी भगवान परशुराम चेतना पीठ भगवान परशुरामांचा हा पुतळा उभारणार आहे. या पीठाने आतापर्यंत मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापुर, आग्रार, जौनपूर, प्रयागराज, बुलंदशहर, हापुड़, गाजियाबाद, श्रावस्ती या शहरांमध्ये 11 फुटांपासून ते 31 फुटांपर्यंतचे भगवान परशुरामांचे पुतळे उभारले आहेत. गाजियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा आणि साहिबाबादमध्ये नवीन रस्त्यांवर भगवान परशुराम चौक बांधण्यात आले आहेत.

    चिरंजीवी भगवान परशुराम चेतना पीठ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भगवान परशुरामांचे मंदिरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी, जौनपूर, भदोही, प्रतापगढ़, श्रावस्ती, गोंडा, महाराजगंज, बस्ती, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर, फैजाबाद आणि सुलतानपुर या शहरांमध्ये देखील भगवान परशुरामांचे पुतळे उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. या सर्व ठिकाणी पुतळा उभारणीसाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे.

    akhiesh yadav`s samajwadi party to install 108 feet Bhagwan Parashuram statue in lucknow for brahmin votes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य