Air India Data Leak : सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या डेटा सेंटरवर सायबर सिक्युरिटी हल्ला झाल्याची माहिती आहे. त्याअंतर्गत डेटा चोरी करण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हा हल्ला झाला होता. एअर इंडियाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. Air India Data Leak cyber attack on Air India 4.5 lakh passengers Personal Info Stolen Including Credit Card Detail
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या डेटा सेंटरवर सायबर सिक्युरिटी हल्ला झाल्याची माहिती आहे. त्याअंतर्गत डेटा चोरी करण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हा हल्ला झाला होता. एअर इंडियाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
या सायबर सुरक्षा हल्ल्यात प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरीस गेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात सुमारे साडेचार लाख प्रवाशांचा डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये देश-विदेशातील प्रवाशांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर आपल्या प्रवाशांना या घटनेबाबत कंपनीने माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांच्या क्रेडिट कार्डचा तपशीलही चोरीला गेला आहे.
प्रवाशांना दिलेली माहिती
प्रभावित प्रवाशांना पाठवलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, ही डेटा चोरी 26 ऑगस्ट 2011 आणि 20 फेब्रुवारी 2021 रोजी झाली. या सायबर सिक्युरिटी हल्ल्यातील नावे, जन्मतारीख, संपर्क तपशील, पासपोर्ट तपशील, तिकीट माहिती, स्टार अलायन्स आणि एआय फ्रिक्वेन्ट फ्लायर डेटा चोरीला गेले आहेत. स्टार अलायन्स ही एक जागतिक कंपनी आहे जिच्याबरोबर एअर इंडियाचे टायअप आहे. फ्रिक्वेंट फ्लायर म्हणजे असे प्रवासी जे नेहमी एअर इंडियाने प्रवास करतात.
क्रेडिट कार्ड डेटाही चोरला
कंपनीने असेही म्हटले आहे की क्रेडिट कार्ड डेटा चोरीला गेला आहे, सीव्हीव्ही किंवा सीव्हीसी क्रमांक चोरीला गेले नाहीत. सीव्हीव्ही क्रमांक कार्डच्या मागील बाजूस असलेल्या 3 अंकांमध्ये असतो, जो पेमेंटच्या वेळी नोंदवावा लागतो.
प्रवाशांच्या सेवेसाठी डेटा प्रोसेसर म्हणून काम करणार्या SITA PSS मधून ही डेटा चोरी झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. डेटा स्टोअर आणि प्रोसेस करण्यासाठी हे काम करते. कंपनीने सांगितले की, 25 फेब्रुवारी 2021 रोजी यासंदर्भात प्रथम त्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर 25 मार्च आणि 5 एप्रिल 2021 रोजी माहिती देण्यात आली.
घटनेचा तपास सुरू आहे
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा सुरक्षेच्या घटनांचा शोध घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच डेटा सुरक्षेसाठी बाह्य तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा पासवर्डही बदलला जात आहे. एअर इंडियाने असे म्हटले आहे की, यापुढे डेटा सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी प्रवाशांना त्यांचे पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे.
Air India Data Leak cyber attack on Air India 4.5 lakh passengers Personal Info Stolen Including Credit Card Detail
महत्त्वाच्या बातम्या
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु
- शेतकरी संघटनांचे अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, आंदोलन मागे घ्यायचेय, चर्चेसाठी पंतप्रधानांना पत्रही पण…
- कोरोना लसीच्या विक्रीतून नऊजण अब्जाधीश, पुण्याचे आदर पूनावालाही मालामाल ; 12.7 अब्ज डॉलर्सचे धनी
- आरबीआयकडून केंद्र सरकारला तब्बल 99 हजार कोटींचा मिळाला आधार
- केरळी मु्स्लिम आणि ख्रिश्चनांचे कल्याण आता पी. विजयन यांच्या हाती