विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनसोबतचा तिढा अद्याप कायम असल्याने पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाई दलाची तैनाती सुरूच असून, आवश्यकता भासल्यास तेथील फौजांची संख्या वाढवण्यास हवाई दल सज्ज आहे, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शनिवारी सांगितले.Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief
दुंडिगल येथील एअर फोर्स अकादमीतील एका संयुक्त पदवीदान परेडनिमित्त पत्रकारांशी बोलताना एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले, पूर्व लडाखच्या काही भागांतून सैन्यमाघारी झाली असली, तरी संपूर्ण सैन्य अद्याप माघारी गेलेले नाही.
मी फार तपशील सांगू शकणार नाही, मात्र एवढे सांगणे पुरेसे आहे की आम्ही तेथे तैनात आहोत. या भागात आमच्यापुढे उभे ठाकणाऱ्या कुठल्याही आव्हानाला अत्यंत कमी वेळात तोंड देण्याची आमची तयारी आहे. अर्थातच, गरज भासली तर आम्ही अधिक सैन्य तैनात करू.
Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ