समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हरदोई येथील जाहीर सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी अखिलेश यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष जोरदार टीका करत असतानाच दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनीही हल्लाबोल केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे.aimim chief asaduddin owaisi said on sp president akhilesh yadav statement indian muslims have nothing to do with muhammad ali jinnah
वृत्तसंस्था
लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हरदोई येथील जाहीर सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी अखिलेश यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष जोरदार टीका करत असतानाच दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनीही हल्लाबोल केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, भारतीय मुस्लिमांचा मोहम्मद अली जिना यांच्याशी काहीही संबंध नाही हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. आपल्या ज्येष्ठांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारून भारताला आपला देश म्हणून निवडले.
अखिलेश यादव यांना असे वाटत असेल की, अशी विधाने करून ते लोकांच्या एका वर्गाला खुश करू शकतात, तर मला वाटते की ते चुकीचे आहे आणि त्यांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत. त्यांनीही स्वतःला शिक्षित करून थोडा इतिहास वाचायला हवा.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव रविवारी समाजवादी विजय रथ घेऊन हरदोईला पोहोचले होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
जाहीर सभेला संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना (मुहम्मद अली) यांनी एकाच संस्थेत शिक्षण घेतले. ते बॅरिस्टर झाले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका विचारधारेवर (RSS) बंदी घातली
aimim chief asaduddin owaisi said on sp president akhilesh yadav statement indian muslims have nothing to do with muhammad ali jinnah
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पुन्हा एकदा पंजाब सरकारवर निशाणा, म्हणाले- अखेरच्या दोन महिन्यांत जनतेला लॉलीपॉप देताहेत!
- धक्कादायक! बुरखा न घालता जीन्स घातली म्हणून मुलीसोबत गैरवर्तन
- CHITRA WAGH VS THAKREY : ‘तुमच्या वडिलांनी ही वेळ आणली’ म्हणत चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना पत्र अन् …ते चार प्रश्न ?
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक रिंगणातून अखिलेश यादव बाहेर; पराभवाची भीती की “यशस्वी माघार”?
- T20 WORLD CUP : WE were not brave enough… ; विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव म्हणाले ‘शोभत नाही…’