• Download App
    जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास न्यायालयाची स्थगिती, अण्णा द्रमुकला धक्का|AIADMK decision ruled out by High Court

    जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास न्यायालयाची स्थगिती, अण्णा द्रमुकला धक्का

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई – तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याच्या तत्कालीन अण्णा द्रमुक सरकारच्या आदेशाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. जयललिता यांचे ‘वेद निलायम’ हे निवासस्थान चेन्नईतील आलिशान पोस गार्डन परिसरात आहे.AIADMK decision ruled out by High Court

    जयललिता यांची पुतणी जे.दीपा जयकुमार आणि भाऊ जे.दीपक यांनी न्यायालयात राज्य सरकारच्या या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने २२ जुलै २०२० रोजी जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याचा आदेश दिला होता.



    निवासस्थानाच्या चाव्या याचिकाकर्त्याकडे सुपूर्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. जयललिता यांच्या या निवासस्थानात कार्यालय, वाचनालय, प्रतिक्षागृह आणि सभागृहाचा समावेश आहे. जयललिता यांच्या आईने १९६० मध्ये ते खरेदी केले होते.

    त्यानंतर, तब्बल तीन दशके जयललिता यांचे येथे वास्तव्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी २०१७ मध्ये जयललिता यांच्या स्मरणार्थ त्यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याची घोषणा केली होती.

    AIADMK decision ruled out by High Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!