• Download App
    अहमदनगर : ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत ! केली ' ही ' मदत Ahmednagar: Sonu Sood becomes angel for 11 year old girl! Kelly 'this' help

    अहमदनगर : ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत ! केली ‘ ही ‘ मदत

     

    वाबळे कुटुंबाने सोनू सूद आमच्या कुटुंबासाठी देवदूतासारखे धावून आले.अशी भावना व्यक्त केली आहे.Ahmednagar: Sonu Sood becomes angel for 11 year old girl! Kelly ‘this’ help


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मागच्या वर्षभरापासून सातत्यानं चर्चेत आहे.सोनू सूदनं कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे.कारण या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळेच या मुलीची शस्रक्रिया यशस्वी झाली आहे.



    जान्हवी शशिकांत वाबळे असं या मुलीचे नाव आहे.वाबळे कुटुंबाने सोनू सूद आमच्या कुटुंबासाठी देवदूतासारखे धावून आले.अशी भावना व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण वाबळे कुटुंब रहाते.जान्हवीच्या पाठीत लहानपणापासूनकुबड निघाल्याने तिला अपंगत्व आले होते.

    दरम्यान अभिनेता सोनू सुदने तिच्या उपचारासाठी केलेल्या आर्थिक मदतीमुळे पुण्यात एका रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्रक्रियाही यशस्वी झाली असून जान्हवीची प्रकृती आता सुधारली असून तिचे अपंगत्व पूर्णपणे गेले आहे.
    ऑक्टोबर २०२१ मध्ये सोनू सूद शिर्डीला साई दर्शनाला आला होता, त्यावेळी त्याने शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच गरजवंतांना वैद्यकीय मदत करण्याची भावना व्यक्त केली होती.

    यावेळी सोनू सूद याचे कोपरगाव येथील मित्र सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांनी जान्हवीचे वडील शशिकांत वाबळे आणि सोनू यांची भेट घडवून आणली.यावेळी वाबळे यांनी सोनू सूदला सर्व परिस्थिती सांगितली.त्याने जाह्नवीच्या वडिलांची व्यथा ऐकून घेतली व त्यांना शस्रक्रियेसाठी आर्थिक मदत ही केली.

    Ahmednagar: Sonu Sood becomes angel for 11 year old girl! Kelly ‘this’ help

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही