• Download App
    अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन : गुजरातमध्ये 350 किलोमीटरचे काम वेगात सुरू; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडून पहाणी Ahmedabad - Mumbai Bullet Train: 350 kms work in Gujarat is in full swing

    अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन : गुजरातमध्ये ३५० किलोमीटरचे काम वेगात सुरू; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडून पहाणी

    वृत्तसंस्था

    सुरत :देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई या मार्गावर सुरू होणे अपेक्षित आहे. याचे गुजरात मधले सुमारे 350 किलोमीटरचे काम वेगात सुरू आहे. यासाठी जमीन संपादनापासून बाकीची सर्व तांत्रिक कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी दिली आहे. Ahmedabad – Mumbai Bullet Train: 350 kms work in Gujarat is in full swing

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनच्या कामकाजाची प्रत्यक्ष सुरत येथील साइटवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी सतीश अग्निहोत्री यांनी कामाच्या प्रगती संदर्भात माहिती दिली. गुजरात मध्ये जमीन संपादनाचे काम 98.5 % पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बुलेट ट्रेनचे तांत्रिक काम देखील वेगात सुरू आहे. महाराष्ट्रात मुंबई परिसरात जमीन संपादनास संदर्भात महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधून काम करत आहोत, असेही अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले. जपानी तंत्रज्ञानाद्वारे अशी बुलेट ट्रेन आकारास येत आहे. सहा वर्षांचा कालावधी यासाठी लागणार आहे. त्यातली 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुजरात मधले काम वेगात सुरू आहे. यातले 80 % बुलेट ट्रेनचे अंतर हे गुजरात मधूनच पार होते. या राज्यातले काम वेगात सुरू ठेवण्याच्या दृष्टीने कर्मचारी जपानी भाषा देखील शिकले आहेत. त्यातून तंत्रज्ञान प्रत्यक्षात कामामध्ये आणण्यासाठी उपयोग होतो, असे सतीश अग्निहोत्री म्हणाले.

    मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुरत मध्ये प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणी केल्यानंतर कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर या कामाने आणखीन वेग पकडला तर येत्या सहा महिन्यांमध्ये चाचणी स्वरूपात काही गोष्टी करता येऊ शकतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

    – महाराष्ट्रात राजकीय अडथळा

    महाराष्ट्रात मात्र भूसंपादनास संदर्भात अजून काही अडथळे आहेत. ठाकरे – पवार सरकारचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. परंतु हा केंद्राचा प्रकल्प असल्याने यामध्ये राज्य सरकारला फारसे काही करता येत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जेव्हा गुजरात मधले काम त्या राज्याच्या अधिक पूर्ण होईल, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सरकारवर दबाव येऊन हे काम देखील पूर्ण करावे लागेल, अशी स्थिती सध्या दिसते आहे.

    Ahmedabad – Mumbai Bullet Train: 350 kms work in Gujarat is in full swing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते