वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काँग्रेसची संसदेतली कामगिरी प्रभावी व्हावी. सत्ताधारी भाजपला संसदेत कडवे आव्हान दिले जावे. निदान काँग्रेसची कामगिरी इतर विरोधकांच्या तुलनेत कमी पडू नये या हेतूने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या संसदेतल्या समित्यांमध्ये बदल केला आहे. Ahead of Monsoon session of Parliament, Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi
पी. चिदंबरम, दिग्विजयसिंग, गौरव गोगोई, मनीष तिवारी, अंबिका सोनी आदी नेत्यांचा संसदीय समित्यांमध्ये समावेश करून काँग्रेसची संसदेतली आक्रमक ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधी संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकसभेतले नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेतेपदी कायम आहेत.
अधीर रंजन चौधरी यांच्याकडून लोकसभेतले नेतेपद काढून घेऊन ते राहुल गांधींना देण्यात येणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. परंतु, त्यामध्ये तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उलट अधीर रंजन चौधरी यांच्याबरोबर गौरव गोगोई या आसाममधल्या तरूण नेत्याची काँग्रेसचा लोकसभेतला उपनेता म्हणून सोनिया गांधींनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या सोबत मनीष तिवारी आणि शशी थरूर हे देखील काँग्रेसचे प्रमुख नेते असतील. के. सुरेश, मणिक्कम टागोर आणि रवनीतसिंग बिट्टू हे काँग्रेसचे प्रतोद असतील.
जे लोकसभेत केले आहे, तसेच सोनिया गांधींनी राज्यसभेतही केले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मदतीला पी. चिदंबरम आणि दिग्विजयसिंग या ज्येष्ठांना दिले आहे. आनंद शर्मा काँग्रेसचे राज्यसभेतले उपनेतेपदी कायम ठेवले आहेत. जयराम रमेश हे मुख्य प्रतोद तर त्यांच्या बरोबरीने अंबिका सोनी, के. सी. वेणूगोपाल हे नेते राज्यसभेतली पक्षाची जिम्मेदारी घेतील.
३७०, ट्रिपल तलाक, कृषी विधेयके या महत्त्वाच्या विषयांवर केंद्र सरकारचा विजय होणार होता हे उघड़ आहे. कारण भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. परंतु, या तीनही विषयांवर काँग्रेसची बाजू प्रखरपणे मांडण्यात आली नाही, हे सोनिया गांधींचे निरीक्षण आहे. त्यामुळे भविष्यातील ३ वर्षांमध्ये या सरकारची किमान ६ अधिवेशने व्हायची आहेत. त्यावेळी काँग्रेसचा विरोध प्रखर दिसला पाहिजे, या हेतूने सोनिया गांधी यांनी एक प्रकारे संसदेतील आपल्या “शॅडो कॅबिनेट”मध्ये बदल केल्याचे मानण्यात येत आहे. पण सोनियांना खासदारांच्या संख्येतील मर्यादेमुळे फेरबदलातही मर्यादा आली
Ahead of Monsoon session of Parliament, Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा
- भविष्यात देशातील १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालणार, पियुष गोयल यांनी सांगितली केंद्र सरकारची योजना
- कापड उद्योगात भारताचा चीनला धक्का, कोरोना काळात अमेरिकेतील निर्यात वाढली
- टी सिरीजचे भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप खंडणीसाठी, मॉडेलसह स्थानिक नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल