वृत्तसंस्था
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि एनआरसी मागे घेण्याची मागणी पुढे आली आहे. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे प्रमुख मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली आहे.Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi
जनतेची शक्ती मोठी असते. शेतकऱ्यांनी दीड वर्षे आंदोलन केले. त्यांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले. त्यामुळे त्यांनी कृषी कायदे मागे घेतले. सिटिझन अमेंडमेंट अॅक्ट अर्थात भारतीय नागरिकत्व कायदा सुधारणा कायदा आणि नॅशनल रजिस्ट्रेशन एनआरसी हे कायदे देखील मागे घ्यावेत. कारण त्यामुळे मुसलमान समाज दुखावला जातो, अशी मागणी मौलाना अर्षद मदानी यांनी केली आहे.
आता या मागणीवरून देखील देशात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुकांवर हे राजकारण प्रभाव टाकेल. मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली असली तरी आता कोणत्या संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच विरोध करण्यासाठी पुढे येणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बैल कितीही हट्टी असला तरी शेतकरी आपले शेत नांगरून घेतोच’, कृषी कायदा रद्द झाल्यावर संजय राऊत यांचे ट्विट
- Swachh Survekshan Awards 2021 : इंदूर सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर, वाराणसीला मिळाला हा सन्मान
- वरुण गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एमएसपीवर कायदा करा, गृहमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करा’
- मुसळधार पावसाने तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले पाणी, पूरसदृश परिस्थितीमुळे मुख्य रस्ता बंद, उड्डाणेही रद्द