विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्यात भरतीचा नवीन आणि महत्त्वाचा मार्ग लवकरच येणार आहे. या योजनेस अग्नीपथ भरती प्रवेश योजना असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना सुरुवातीला तीन वर्षे सैन्यात शिपाई या पदावर भरती करण्यात येईल. त्यामुळे भारतीय लष्कराच्या सध्याच्या वयोगटात मोठा बदल होईल.
तीन वर्षे सेवा करण्याºया जवानांना अग्नि वीर असे म्हटले जाईल.Agneepath Recruitment Scheme for young people who want to join the Army, get a job opportunity for three years
हा कार्यकाळ संपल्यानंतर यातील काही अग्नी वीरांना पुढे सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय संरक्षण दलांकडे असणार आहे. हा संपूर्ण आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच, तीनही दलाकडून आराखड्याच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या उच्च स्तरावर सादरीकरण केले जात आहे.
या विषयावर दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्युटी यावर चर्चा झाली होती. तेव्हापासून हा मुद्दा सुरू झाला. तसेच, अल्पमुदत करारानुसार भरती केली जाईल. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देवून वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात येईल. तसेच, संरक्षण दलांना विशिष्ट कामांसाठी तज्ञांची नियुक्ती करू शकतील.
कोरोना महामारीच्या काळात सशस्त्र दलातील सैनिकांच्या भरतीवर मोठा परिणाम झाला आहे.
तर तिन्ही सेवा दलामध्ये १.२५ लाखांहून अधिक पदे हे रिक्त आहेत. लष्कराच्या बैठका घेऊन हा आराखडा निश्चित होईल. सुरुवातीच्या योजनेनुसार, या अग्निवीरांना संरक्षण सेवेची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाजगी क्षेत्रात नागरी नोकऱ्या दिल्या जातील. अनेक कंपन्यांनी या अग्निशमन दलाला सेवेत ठेवण्यास स्वारस्य दाखवले आहे. त्यामूळे या कंपन्यांना लष्करी प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध सैनिकांचा फायदा होईल.
Agneepath Recruitment Scheme for young people who want to join the Army, get a job opportunity for three years
महत्त्वाच्या बातम्या
- पोलीस गुन्हेगारांपेक्षा दोन पावले पुढे राहणार फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक मंजूर
- अब्बासी याने पाठवले ISIS बँक खात्यात लाखो रुपये
- ED Inquiry : ईडीच्या रडारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्प; 200 एकर जमिनीच्या व्यवहाराचा तपास!!