• Download App
    अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!|Agneepath Air Force: Firemen get 1 crore insurance, catering facility, 30 vacations and many other benefits !!

    अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय सैन्य दल भरतीच्या अग्निपथ योजनेला गैरसमजातून विरोध होत असताना अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांच्या भरती संदर्भातली सर्व माहिती हवाई दलाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे. त्यानूसार,4 वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना वायुसेनेतर्फे अनेक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या सोयी सुविधा हवाई दलाच्या नियमित जवानांना मिळतात त्याच सुविधा अग्निवीरांना दिल्या जाणार आहेत.Agneepath Air Force: Firemen get 1 crore insurance, catering facility, 30 vacations and many other benefits !!

    अग्निवीरांना मासिक पगारासह कष्ट भत्ता, गणवेश भत्ता यासह कॅटिंग सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळणार आहे. या सर्व सुविधा नियमित सैनिकाला दिल्या जातात.



    एक कोटी रुपयांचे विमा कवच

    अग्निवीरांना सेवेदरम्यान प्रवासी भत्तासह 30 दिवसांची सुट्टी देखील मिळणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना वैद्यकीय सुट्या देखील वेगळ्या असतील. यासोबतच सीएसडी कॅटिंगची सुविधा देखील मिळणार आहे. दुर्दैवाने जर सेवेदरम्यान एखादा अग्निवीरांला मरण आले तर त्याच्या कुटुंबियांना विम्याअंतर्गत एक कोटी रुपये मिळेल.

    कामगिरीच्या आधारे नियुक्ती

    एअर फोर्स कायदा 1950 अंतर्गत ही भरती होत आहे. याचा कार्यकाळ 4 वर्षांचा असेल. अग्निवीरांना हवाई दलात वेगळी रँक असेल जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असणार आहे. अग्निवीरांना या योजने संबधीचे सर्व अटी आणि शर्ती मान्य करावेच लागतील. या भरतीसाठी उमेदवाराचे वय जर 18 पेक्षा कमी असेल तर त्यांना नियुक्ती पत्रावर कुटुंबीयांची स्वाक्षरी आणावी लागणार आहे. 4 वर्षांच्या सेवेनंतर 25 % अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतले जाईल. 25 % अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

    सेवा काळात मृत्यू झाल्यास…

    अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा कालावधीत 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय त्यांना 44 लाख रुपयांची एकरकमी रक्कमही दिली जाणार आहे. याशिवाय 4 वर्षाच्या नोकरीत जेवढी सेवा शिल्लक राहिली असेल तो पगारही अग्निवीरच्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे. याशिवाय अग्निवीरच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये जमा झालेल्या रकमेवरील सरकारी योगदान आणि व्याजही अग्निवीरच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.

    Agneepath Air Force: Firemen get 1 crore insurance, catering facility, 30 vacations and many other benefits !!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो