• Download App
    उत्तर प्रदेशात भाजपमध्ये खळबळ; मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा; समाजवादी पक्षात सामील होणार । Agitation in BJP in Uttar Pradesh; Minister Swami Prasad Maurya resigns; Will join the socialist party

    उत्तर प्रदेशात भाजपमध्ये खळबळ; मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा; समाजवादी पक्षात सामील होणार

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आजच समाजवादी पक्ष मध्ये सामील होत आहेत. Agitation in BJP in Uttar Pradesh; Minister Swami Prasad Maurya resigns; Will join the socialist party

    स्वामी प्रसाद मौर्य हे एकेकाळी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचे उजवे हात मानले जात असत. 2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मायावती यांचा बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि ते योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात श्रम आणि रोजगार मंत्री बनले. परंतु आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अचानक स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधून राजीनामा दिला असून राज्यात दलित, पिछडे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजपचा त्याग करून ते समाजवादी पक्षात दाखल होत आहेत.

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे भाजपने पाच जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती. परंतु आता स्वामी प्रसाद मौर्य आहे भाजप सोडून चालले असल्यामुळे भाजपपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    महत्त्वाचे म्हणजे स्वामी प्रसाद मोरे यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या बदायूं मधून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते धर्मेंद्र यादव यांचा तेथे पराभव केला होता. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पक्षांतरामुळे प्रतापगड जिल्हा आणि बधाई प्रदान या परिसरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

    Agitation in BJP in Uttar Pradesh; Minister Swami Prasad Maurya resigns; Will join the socialist party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!