• Download App
    ऑक्सिजन प्लॅँट उभारण्याबाबतचे अपयश उघड झाल्यावर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना उपरती, रुग्णालयांना म्हणाले उगाच ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत बोलूच नका After the failure to set up an oxygen plant was exposed, the Deputy Chief Minister of Delhi told the hospitals not to talk about the shortage of oxygen.

    ऑक्सिजन प्लॅँट उभारण्याबाबतचे अपयश उघड झाल्यावर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना उपरती, रुग्णालयांना म्हणाले उगाच ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत बोलूच नका

    दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सातत्याने बोलत होते. परंतु, केंद्राकडून निधी मिळाल्यावरही दिल्ली सरकारच ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले. आपले पितळ उघड पडल्यावर आता सिसोदिया यांना उपरती झाली असून रुग्णालयांनी ऑक्सिजन तुटवड्याबाबत बोलू नये असा सल्ला दिला आहे.


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सातत्याने बोलत होते. परंतु, केंद्राकडून निधी मिळाल्यावरही दिल्ली सरकारच ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले. आपले पितळ उघड पडल्यावर आता सिसोदिया यांना उपरती झाली असून रुग्णालयांनी ऑक्सिजन तुटवड्याबाबत बोलू नये असा सल्ला दिला आहे. After the failure to set up an oxygen plant was exposed, the Deputy Chief Minister of Delhi told the hospitals not to talk about the shortage of oxygen.

    दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांनी त्याचे खापर केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्राकडून निधी मिळाल्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत दिल्ली राज्य सरकारने ऑक्सिजनचे प्लॅटच उभारले नाही, असे उघड झाले.



    त्यानंतर मात्र सिसोदिया यांची भाषा बदलली आहे. त्यांनी आता रुग्णालयांना आवाहन केले आहे की, विनाकारण ऑक्सिजन तुटवड्याबाबत बोलू नका. तुटवडा असल्याचा इशारा देऊ नका. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत काही सांगितले गेल्यास त्याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्या. रुग्णालयांनी या पध्दतीने इशारा दिल्यावर लोकांमध्ये घबराट माजते. त्यामुळे मदतीच्या प्रयत्नांना मर्यादा येतात, असे त्यांनी म्हटले आहे.

    सिसोदिया म्हणाले मला सकाळी एका रुग्णालयाचा फोन आला. त्यांच्याकडे १८ किलो लीटर ऑक्सिजन स्टॉकमध्ये होता. त्यांची दररोजची गरज ४.८ किलो लीटर आहे. त्यामुळे हा ऑक्सिजन त्यांना तीन दिवस तरी पुरणार होता. तरीही ते आणखी ऑक्सिजन मागत होते. एका छोट्या रुग्णालयाने आपल्याकडे ऑक्सिजन नसल्याचे सांगितले. तपासणी केल्यावर त्यांना ३० सिलेंडर देण्यात आले होते. त्यातील २० सिलेंडर त्यांनी वापरले होते. त्यामुळे माझे रुग्णालयांना आवाहन आहे की विनाकारण ऑक्सिजन तुटवड्याची मागणी नोंदवू नका.

    After the failure to set up an oxygen plant was exposed, the Deputy Chief Minister of Delhi told the hospitals not to talk about the shortage of oxygen.

     

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य