• Download App
    केंद्रीय मंत्री कौशल किशोर : व्यसनामुळे मुलगा गेल्यानंतर सुनेच्या पुढाकारातून चालवताहेत व्यसनमुक्ती आंदोलनAfter the death of the son due to addiction, the anti-addiction movement is run by the initiative of the daughter-in-law

    केंद्रीय मंत्री कौशल किशोर : व्यसनामुळे मुलगा गेल्यानंतर सुनेच्या पुढाकारातून चालवताहेत व्यसनमुक्ती आंदोलन

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एरवी केंद्रीय मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचायची सवय असलेल्यांना एक वेगळी बातमी वाचायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा तरुण वयातच व्यसनाधीनतेमुळे गेला. पण त्याच्या चितेला अग्नी देतानाच त्यांनी प्रतिज्ञा केली की ते व्यसनमुक्तीचे आंदोलन चालवतील. आता या आंदोलनात त्यांच्या सुनेने देखील पुढाकार घेतला आहे कौशल किशोर यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून या आंदोलनाची माहिती दिली आहे. After the death of the son due to addiction, the anti-addiction movement is run by the initiative of the daughter-in-law

    कौशल किशोर मोदी मंत्रिमंडळात नागरी विकास राज्यमंत्री आहेत. ते उत्तर प्रदेशातील मोहनलाल गंज म्हणून लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्या मुलाचा अतिशय तरुण वयात 2020 मध्येच व्यसनाधीनतेमुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या तरुण सुनेला दुसरा विवाह करण्याची सूचना केली. इतकेच नाही तर ते आणि त्यांची पत्नी या दोघांनीही हा विवाह योग्य ठिकाणी करून देण्याचे आश्वासनही तिला दिले. परंतु या तरुण सुनेने त्यांची सूचना नाकारली आणि स्वतः व्यसनमुक्ती आंदोलनासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. कोणत्याही तरुणाच्या व्यसनाधीनतेमुळे कोणतीही तरुण मुलगी विधवा होऊ नये यासाठी आपण हे आंदोलन करू, असे कौशल किशोर यांच्या सुनेने त्यांना सांगितल्याचे त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.

    बीकेटी मधील भोला पूरवा गाव मध्ये अभियान कौशल का या अंतर्गत ग्रामस्थांनी दीपयात्रा काढली होती. जीवनाच्या अखेरचा श्वासापर्यंत आपण व्यसनाला स्पर्श करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली. संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला.

    कौशल किशोर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला असून देशात सर्वत्र दारूबंदी लागू करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट, ड्रग्स विरोधात सरकारने संसदेत कायदा संमत करण्याची मागणी देखील अनेकांनी केली आहे. स्वतः कौशल किशोर यांनी प्रायव्हेट मेंबर बिल आणले, तर त्याला भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांच्या अभियानात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    After the death of the son due to addiction, the anti-addiction movement is run by the initiative of the daughter-in-law

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य